IND vs SA 4rth T20I Live Updates : भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले, संथ खेळ पाहुन राहुल द्रविडला आवरली नाही जांभई, Photo

India vs South Africa 4rth T20I Live Updates : : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय  संघाने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जीवंत ठेवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:00 PM2022-06-17T20:00:30+5:302022-06-17T20:01:01+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 4rth T20I Live Updates : Ishan Kishan goes for 27 in 26 balls. India now 3 down for 40 Rahul Dravid yawning, photo viral | IND vs SA 4rth T20I Live Updates : भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले, संथ खेळ पाहुन राहुल द्रविडला आवरली नाही जांभई, Photo

IND vs SA 4rth T20I Live Updates : भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले, संथ खेळ पाहुन राहुल द्रविडला आवरली नाही जांभई, Photo

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 4rth T20I Live Updates : : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय  संघाने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जीवंत ठेवली. त्यामुळेच राजकोट येथे सुरू असलेला सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, तसा खेळ त्यांच्याकडून झालेला पाहायला मिळत नाही. मालिकेत २-१ अशा आघाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने यजमानांचे आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी पाठवले.

 
नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने जिंकला अन् प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभने संघात कोणतेच बदल न करण्याचा निर्णय घेतला. पण आफ्रिकेचा संघ तीन बदलांसह मैदानावर उतरला.. कागिसो रबाडा, वेन पार्नेल व रिझा हेड्रिक्स यांच्या जागी आज मार्को येनसेन, क्विंटन डी कॉक व लुंगी एनगिडी खेळणार आहेत. रबाडा व पार्नेल दोघंही दुखापतग्रस्त झाले आहेत. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीतही आफ्रिकेने सुरुवातीच्या षटकांत भारताला धक्के दिले. मागच्या सामन्यातील अर्धशतकवीर ऋतुराज गायकवाड ( ५), श्रेयस अय्यर ( ४) हे झटपट माघारी परतले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या इशान किशनला ( २७ ) एनरिच नॉर्खियाने त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. भारताने आघाडीचे तीनही फलंदाज ४० धावांवर गमावले.

हार्दिक पांड्या व रिषभ पंत हे फॉर्मशी झगडणारे दोन फलंदाज मैदानावर होते आणि त्यानी सावध खेळावरच भर दिला. भारताला पहिल्या १० षटकांत ३ बाद ५६ धावा करता आल्या. भारतीय खेळाडूंची संथ खेळी पाहून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यालाही जांभई आवरता आली नाही. 


 

Web Title: IND vs SA 4rth T20I Live Updates : Ishan Kishan goes for 27 in 26 balls. India now 3 down for 40 Rahul Dravid yawning, photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.