Join us  

IND vs SA 4th T20I Live Updates : Dinesh Karthik अन् हार्दिक पांड्या यांनी टीम इंडियाची राखली लाज, कार्तिकने मोडला MS Dhoniचा विक्रम 

India vs South Africa 4rth T20I Live Updates : दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) आयपीएल २०२२चा फॉर्म कायम राखताना भारताचा डाव सारवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 8:43 PM

Open in App

India vs South Africa 4rth T20I Live Updates : दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) आयपीएल २०२२चा फॉर्म कायम राखताना भारताचा डाव सारवला. आघाडीचे तीन फलंदाज ४० धावांवर माघारी परतल्यानंतर दिनेश व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी पाचव्या विकेटसाठी ३३ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. भारताने त्यांच्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. दिनेश कार्तिकने ट्वेंटी-२० तील पहिले अर्धशतक झळकावताना MS Dhoniचा विक्रम मोडला. 

नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने जिंकला अन् प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभने संघात कोणतेच बदल न करण्याचा निर्णय घेतला. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीतही आफ्रिकेने सुरुवातीच्या षटकांत भारताला धक्के दिले. मागच्या सामन्यातील अर्धशतकवीर ऋतुराज गायकवाड ( ५), श्रेयस अय्यर ( ४) हे झटपट माघारी परतले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या इशान किशनला ( २७ ) एनरिच नॉर्खियाने त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. भारताने आघाडीचे तीनही फलंदाज ४० धावांवर गमावले.

हार्दिक पांड्या व रिषभ पंत हे फॉर्मशी झगडणारे दोन फलंदाज मैदानावर होते आणि त्यानी सावध खेळावरच भर दिला. भारताला पहिल्या १० षटकांत ३ बाद ५६ धावा करता आल्या. रिषभला ९ धावांवर असताना केशव महाराजने जीवदान दिले. हार्दिकने १२ व्या षटकात तब्रेझ शम्सीला दोन खणखणीत षटकार मारून माहोल बदलला. पण, जीवदान मिळूनही रिषभ चुकला.. केशव महाराजच्या पुढच्याच षटकात १७ धावांवर झेल देऊन तो माघारी परतला. हार्दिकसह त्याने ४० चेंडूंत ४१ धावांची भागीदारी केली. हार्दिकने दमदार खेळ सुरूच ठेवला आणि भारताला १५ षटकांत १०० धावांचा पल्ला गाठून दिला.

हार्दिक व दिनेश कार्तिक यांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हार्दिकनंतर फलंदाजीला येऊनही दिनेशने त्याच्यापेक्षा अधिक धावा केल्या. १९व्या षटकात तब्रेझ शम्सीने अफलातून कॅच घेतला. हार्दिक ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. ट्वेंटी-२० तील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. दिनेशने २६ चेंडूंत ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढच्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. दिनेशने २७ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा केल्या.

यासह भारताकडून ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावणारा तो वयस्कर खेळाडू ठरला. त्याने ३७ वर्ष व १६ दिवसांचा असताना आज हा पराक्रम केला. यासह महेंद्रसिंग धोनीचा ( ५२*) ३६ वर्ष व २२९ दिवसांचा ( वि. दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २०१८) विक्रम मोडला. ( Dinesh Karthik became Oldest Indian player to Score Half Century in T20I (37yr 16d). भारताने ६ बाद १६९ धावा केल्या. यापैकी ७३ धावा या अखेरच्या ५ षटकांत आल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादिनेश कार्तिकहार्दिक पांड्यामहेंद्रसिंग धोनी
Open in App