IND vs SA 4th T20I Live Updates : सहकाऱ्यानेच दिला दगा, Quinton de Kock खेळपट्टीच्या मधोमध राहिला उभा अन्... Video 

India vs South Africa 4rth T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 09:48 PM2022-06-17T21:48:10+5:302022-06-17T21:48:24+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 4th T20I Live Updates : Quinton de Kock is run-out due to a mix-up between him and Dwaine Pretorius, Video  | IND vs SA 4th T20I Live Updates : सहकाऱ्यानेच दिला दगा, Quinton de Kock खेळपट्टीच्या मधोमध राहिला उभा अन्... Video 

IND vs SA 4th T20I Live Updates : सहकाऱ्यानेच दिला दगा, Quinton de Kock खेळपट्टीच्या मधोमध राहिला उभा अन्... Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 4rth T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले आहे. भारताच्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात संथ झाली. कर्णधार टेब्मा बवुमा याला दुखापतीमुळे रिटायर्ट हर्ट होऊन माघारी जावे लागले. त्यात धावा निघत नसल्यामुळे आफ्रिकेच्या फलंदाजांवर दडपण वाढत गेले आणि त्याचाच फटका म्हणून क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) बाद झाला. 

दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) आयपीएल २०२२चा फॉर्म कायम राखताना भारताचा डाव सारवला. आघाडीचे तीन फलंदाज ४० धावांवर माघारी परतल्यानंतर दिनेश व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी डाव सावरला. ऋतुराज गायकवाड ( ५), श्रेयस अय्यर ( ४) व इशान किशन ( २७ ) हे  फलकावर ४० धावांवर माघारी परतले. हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी सावध सुरुवात केली, परंतु त्यांनी ४१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सेट केला. रिषभला ( १७) मोठी खेळी करण्यात आजही अपयश आले. 

हार्दिक व दिनेश कार्तिक ३३ चेंडूंत ६५ धावा जोडताना भारताला समाधानकारक पल्ला उभारून दिला. हार्दिक ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. दिनेश भारताकडून ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावणारा तो वयस्कर खेळाडू ठरला. त्याने ३७ वर्ष व १६ दिवसांचा असताना आज हा पराक्रम केला. यासह महेंद्रसिंग धोनीचा ( ५२*) ३६ वर्ष व २२९ दिवसांचा ( वि. दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २०१८) विक्रम मोडला. दिनेश २७ चेंडूंत ९ चौकार व २ षटक खेचून ५५ धावांवर माघारी परतला. भारताने ६ बाद १६९ धावा केल्या. यापैकी ७३ धावा या अखेरच्या ५ षटकांत आल्या. 

भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना आफ्रिकेच्या धावांवर लगाम लावला होता. त्यात कर्णधार टेम्बा बवुमा याला दुखापतीमुले रिटायर्ड हर्ट होऊन माघारी जावे लागले. पाचव्या षटकात क्विंटन डी कॉक व ड्वेन प्रेटोरीयस यांच्यातला ताळमेळ चुकला अन् क्विंटनला १४ धावांवर रन आऊट होऊन माघारी जावं लागलं. हर्षल पटेलच्या षटकात क्विंटनने चेंडूला हलका फटका मारला अन् धाव घेण्यासाठी धावला. प्रेटोरियसही आधी पळाला, परंतु नंतर त्याने माघार घेतली. तोपर्यंत हर्षल चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि त्याने क्विंटनला रन आऊट केले. भारतीय गोलंदाजांनी दडपण बनवण्यात यश मिळवले होते. त्यानंतर आवेश खानने आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना प्रेटोरीयसला भोपळ्यावर बाद केले.

पाहा विकेट
 

Web Title: IND vs SA 4th T20I Live Updates : Quinton de Kock is run-out due to a mix-up between him and Dwaine Pretorius, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.