Join us  

Sunil Gavaskar, IND vs SA 4th T20I Live Updates : Dinesh Karthikच्या स्फोटक खेळीनंतर सुनील गावस्कर यांचं मोठं विधान, म्हणाले...

India vs South Africa 4rth T20I Live Updates : २००६मध्ये भारताच्या पहिल्या ट्वेंटी-२० संघाचा सदस्य असलेल्या दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) आज पहिले अर्धशतक झळकावले. दक्षिण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 9:16 PM

Open in App

India vs South Africa 4rth T20I Live Updates : २००६मध्ये भारताच्या पहिल्या ट्वेंटी-२० संघाचा सदस्य असलेल्या दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) आज पहिले अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या ट्वेंटी-२०त भारतीय संघ अडचणीत असताना दिनेशने हार्दिक पांड्यासह ( Hardik Pandya) डाव सावरला. या दोघांनी भारताला समाधानकारक पल्ला गाठून देताना अखेरच्या ५ षटकांत ७३ धावा चोपल्या. कार्तिकच्या या स्फोटक खेळीनंतर महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी मोठे विधान केले.  

दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) आयपीएल २०२२चा फॉर्म कायम राखताना भारताचा डाव सारवला. आघाडीचे तीन फलंदाज ४० धावांवर माघारी परतल्यानंतर दिनेश व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी डाव सावरला. ऋतुराज गायकवाड ( ५), श्रेयस अय्यर ( ४) व इशान किशन ( २७ ) हे  फलकावर ४० धावांवर माघारी परतले. हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी सावध सुरुवात केली, परंतु त्यांनी ४१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सेट केला. रिषभला ( १७) मोठी खेळी करण्यात आजही अपयश आले. 

हार्दिक व दिनेश कार्तिक ३३ चेंडूंत ६५ धावा जोडताना भारताला समाधानकारक पल्ला उभारून दिला. हार्दिक ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. दिनेश भारताकडून ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावणारा तो वयस्कर खेळाडू ठरला. त्याने ३७ वर्ष व १६ दिवसांचा असताना आज हा पराक्रम केला. यासह महेंद्रसिंग धोनीचा ( ५२*) ३६ वर्ष व २२९ दिवसांचा ( वि. दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २०१८) विक्रम मोडला. दिनेश २७ चेंडूंत ९ चौकार व २ षटक खेचून ५५ धावांवर माघारी परतला. भारताने ६ बाद १६९ धावा केल्या. यापैकी ७३ धावा या अखेरच्या ५ षटकांत आल्या.

सुनील गावस्कर म्हणाले,''दिनेश कार्तिकचं वय पाहू नका.. तो काय करतोय, कसा खेळतोय हे पाहा. जर कार्तिक मेलबर्नच्या ( ट्वेंटी-२० वर्ल्ड कप) फ्लाईटमध्ये नसेल तर मला सर्वात जास्त आश्चर्य वाटेल. भारताच्या ट्वेंटी-२० संघात कार्तिकचे नाव नसणे हा सर्वात  मोठा धक्का असेल.'' 

पाहा दिनेश कार्तिकची फटकेबाजी...

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादिनेश कार्तिकसुनील गावसकर
Open in App