IND vs SA 5th T20I Live Updates : रिषभ पंतच्या ऐतिहासिक विक्रमाच्या मार्गात खोडा; खेळाडूंना सोडावे लागले मैदान, Video

India vs South Africa 5th T20I Live Updates : ०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 07:12 PM2022-06-19T19:12:59+5:302022-06-19T19:13:43+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 5th T20I Live Updates : Rain has started at Chinnaswamy Stadium, players are going off, Match delayed, Video  | IND vs SA 5th T20I Live Updates : रिषभ पंतच्या ऐतिहासिक विक्रमाच्या मार्गात खोडा; खेळाडूंना सोडावे लागले मैदान, Video

IND vs SA 5th T20I Live Updates : रिषभ पंतच्या ऐतिहासिक विक्रमाच्या मार्गात खोडा; खेळाडूंना सोडावे लागले मैदान, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 5th T20I Live Updates : ०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. पाचवा व अंतिम सामना आज बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे आणि तो जिंकल्यास आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रिषभ पंत ( Rishabh Pant) हा पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. यापूर्वी विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांनाही असा पराक्रम करता आलेला नाही. पण, ऐतिहासिक कामगिरीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे आणि खेळाडूंना मैदान सोडून पुन्हा पेव्हेलियनमध्ये जावे लागले. 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma) याला चौथ्या सामन्यात दुखापत झाली होती. भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर त्याच्या उजव्या हाताला मार लागला होता आणि त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला होता. त्याची दुखापत अजूनही बरी झाली नसल्याने त्याने पाचव्या सामन्यातून माघार घेतली. केशव महाराज आज दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व सांभाळणार आहे. आफ्रिकेचा कर्णधार बदलला तरीही टीम इंडियाला नाणेफेक जिंकता आलेली नाही. केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

आफ्रिकेच्या संघात तीन बदल झाले असून कागिसो रबाडा, रिझा हेड्रिक्स व त्रिस्तान स्तुब्ब्स हे आज खेळणार आहेत. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही संघांचे खेळाडू सामना सुरू करण्यासाठी मैदानावर येताच पावसानेही एन्ट्री घेतली आणि त्यामुळे सर्वांना पुन्हा पेव्हेलियनमध्ये परतावे लागले.

Web Title: IND vs SA 5th T20I Live Updates : Rain has started at Chinnaswamy Stadium, players are going off, Match delayed, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.