Ruturaj Gaikwad, IND vs SA 5th T20I Live Updates : ऋतुराज गायकवाडने ग्राऊंड्समनला झिडकारले, Video Viral होताच नेटिझन्स खवळले 

IND vs SA 5th T20I Live Updates : ऋतुराज गायकवाडच्या कृतीची निंदा होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 09:11 PM2022-06-19T21:11:14+5:302022-06-19T21:11:32+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 5th T20I Live Updates : Ruturaj Gaikwad Refuse to Take selfie with groundman, Video Viral   | Ruturaj Gaikwad, IND vs SA 5th T20I Live Updates : ऋतुराज गायकवाडने ग्राऊंड्समनला झिडकारले, Video Viral होताच नेटिझन्स खवळले 

Ruturaj Gaikwad, IND vs SA 5th T20I Live Updates : ऋतुराज गायकवाडने ग्राऊंड्समनला झिडकारले, Video Viral होताच नेटिझन्स खवळले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 5th T20I Live Updates : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताला साजेशी सुरुवात करता आलेली नाही. इशान किशनने ( ishan kishan) पहिल्या षटकात दोन षटकारांसह १६ धावा केल्या, परंतु दुसऱ्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी ठरला आणि भारताला २७ धावांत २ धक्के बसले. त्यानंतर पुन्हा पावसाने एन्ट्री घेतलीय.

पावसामुळे हा सामना प्रत्येकी १९-१९ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. केशव महाराजने टाकलेल्या पहिल्याच षटकात इशान किशनने दोन षटकारांसह १६ धावा कुटल्या. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे हे होम ग्राऊंड असल्यामुळे येथे RCB, RCB नावाच्या घोषणा होत होत्या. या मालिकेत २००+धावा करणारा इशान हा पहिलाच फलंदाज ठरला. पण, लुंगी एनगिडीने दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला धक्का दिला. एनगिडीने टाकलेला स्लोव्ह यॉर्कर खेळण्यास इशान चुकला अन् त्याचा त्रिफळा उडाला. ७ चेंडूंत १५ धावा करून तो माघारी परतला. ऋतुराजकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तोही चौथ्या षटकात एनगिडीच्या स्लोव्ह चेंडूवर फसला अन् १० धावांवर झेल देऊन माघारी परतला. भारताचे दोन्ही सलामीवीर २७ धावांत तंबूत परतले. 

दरम्यान, ऋतुराज गायकवाडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डगआऊटमध्ये बसलेल्या ऋतुराजसोबत सेल्फी घेण्यासाठी ग्राऊंड्समन गेला अन् भारतीय सलामीवीराच्या बाजूला जाऊन बसला. त्यानंतर ऋतुराजने त्याला झिडकारले.. ऋतुराजच्या त्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.




Web Title: IND vs SA 5th T20I Live Updates : Ruturaj Gaikwad Refuse to Take selfie with groundman, Video Viral  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.