IND vs SA 5th T20I Live Updates : निर्णायक लढतीत दक्षिण आफ्रिकेला धक्का, भारताच्या मार्गातील दूर झाला मोठा अडथळा

भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 06:35 PM2022-06-19T18:35:52+5:302022-06-19T18:41:03+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 5th T20I Live Updates : Temba Bavuma ruled out & Keshav Maharaj to lead the South African side, SA won the toss and decided to field first. | IND vs SA 5th T20I Live Updates : निर्णायक लढतीत दक्षिण आफ्रिकेला धक्का, भारताच्या मार्गातील दूर झाला मोठा अडथळा

IND vs SA 5th T20I Live Updates : निर्णायक लढतीत दक्षिण आफ्रिकेला धक्का, भारताच्या मार्गातील दूर झाला मोठा अडथळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 5th T20I Live Updates : ०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. पाचवा व अंतिम सामना आज बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे आणि तो जिंकल्यास आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रिषभ हा पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. पण, ऐतिहासिक कामगिरीच्या मार्गात पाऊस खोडा घालण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. निर्णायक सामन्यात आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. 

    
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma) याला चौथ्या सामन्यात दुखापत झाली होती. भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर त्याच्या उजव्या हाताला मार लागला होता आणि त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला होता. त्याची दुखापत अजूनही बरी झाली नसल्याने त्याने पाचव्या सामन्यातून माघार घेतली. केशव महाराज आज दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व सांभाळणार आहे. आफ्रिकेचा कर्णधार बदलला तरीही टीम इंडियाला नाणेफेक जिंकता आलेली नाही. केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

आफ्रिकेच्या संघात तीन बदल झाले असून कागिसो रबाडा, रिझा हेड्रिक्स व त्रिस्तान स्तुब्ब्स हे आज खेळणार आहेत. भारतीय संघात बदल करण्यात आलेला नाही.

Web Title: IND vs SA 5th T20I Live Updates : Temba Bavuma ruled out & Keshav Maharaj to lead the South African side, SA won the toss and decided to field first.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.