India vs South Africa 5th T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाने खोडा घातला. टेम्बा बवुमाच्या अनुपस्थितीत केशव महाराज आफ्रिकेच्या कर्णधाराच्या भूमिकेत दिसला अन् त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड व इशान किशन मैदानावर आले आणि आफ्रिकेने फिल्ड सेटींग केली. तितक्याच पावसाने एन्ट्री मारली आणि सर्व खेळाडूंना पुन्हा माघारी जावे लागले. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. आता पाऊस थांबला आहे, परंतु सामन्याची वेळ बदलली आहे आणि षटकांची संख्याही कमी झाली आहे.
०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. पाचवा व अंतिम सामना आज बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे आणि तो जिंकल्यास आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रिषभ पंत ( Rishabh Pant) हा पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. यापूर्वी विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांनाही असा पराक्रम करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma) याला चौथ्या सामन्यात दुखापत झाली होती. केशव महाराज आज दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व सांभाळणार आहे.
आफ्रिकेचा कर्णधार बदलला तरीही टीम इंडियाला नाणेफेक जिंकता आलेली नाही. केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या संघात तीन बदल झाले असून कागिसो रबाडा, रिझा हेड्रिक्स व त्रिस्तान स्तुब्ब्स हे आज खेळणार आहेत. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही संघांचे खेळाडू सामना सुरू करण्यासाठी मैदानावर येताच पावसानेही एन्ट्री घेतली आणि त्यामुळे सर्वांना पुन्हा पेव्हेलियनमध्ये परतावे लागले.
आता पाऊस थांबला आहे आणि मैदान सुकवण्याचे काम सुरू आहे. भारतीय वेळेप्रमाणे 7.50 वाजता सामना सुरू होईल आमि 19-19 षटकांचा हा सामना होईल.
Web Title: IND vs SA 5th T20I Live Updates : Update from Bengaluru, The rain has STOPPED & the covers are coming OFF, Match to start at 7:50pm IST, 19 overs per side
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.