India vs South Africa 5th T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाने खोडा घातला. टेम्बा बवुमाच्या अनुपस्थितीत केशव महाराज आफ्रिकेच्या कर्णधाराच्या भूमिकेत दिसला अन् त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड व इशान किशन मैदानावर आले आणि आफ्रिकेने फिल्ड सेटींग केली. तितक्याच पावसाने एन्ट्री मारली आणि सर्व खेळाडूंना पुन्हा माघारी जावे लागले. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. आता पाऊस थांबला आहे, परंतु सामन्याची वेळ बदलली आहे आणि षटकांची संख्याही कमी झाली आहे.
०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. पाचवा व अंतिम सामना आज बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे आणि तो जिंकल्यास आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रिषभ पंत ( Rishabh Pant) हा पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. यापूर्वी विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांनाही असा पराक्रम करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma) याला चौथ्या सामन्यात दुखापत झाली होती. केशव महाराज आज दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व सांभाळणार आहे.
आता पाऊस थांबला आहे आणि मैदान सुकवण्याचे काम सुरू आहे. भारतीय वेळेप्रमाणे 7.50 वाजता सामना सुरू होईल आमि 19-19 षटकांचा हा सामना होईल.