भुवी-बुमराह यांच्यावर भारी पडला अर्शदीप सिंग; विक्रमी कामगिरीसह ठरला नवा किंग

तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी जलगदती गोलंदाज ठरलाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 01:31 PM2024-11-14T13:31:43+5:302024-11-14T13:38:40+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA Arshdeep Singh Overtake Bhuvneshwar Kumar And Hold Record Become Indian Pacer With Most Wickets In T20Is | भुवी-बुमराह यांच्यावर भारी पडला अर्शदीप सिंग; विक्रमी कामगिरीसह ठरला नवा किंग

भुवी-बुमराह यांच्यावर भारी पडला अर्शदीप सिंग; विक्रमी कामगिरीसह ठरला नवा किंग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग याने टी-क्रिकेटमध्ये सिंग इज शो दाखवून दिलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियनच्या मैदानातील तिसऱ्या टी-२० सामन्यात मार्को यान्सेन तुफान फटकेबाजीनं सामन्याला कलाटणी देण्याच्या मूडमध्ये खेळताना दिसला. पण अर्शदीप सिंग आला अन् त्याने मार्कोला पायचित करत सामना टीम इंडियासाठी अगदी सेफ केला. या महत्त्वपूर्ण विकेटसह अर्शदिप सिंग टी-२० क्रिकेटमधील जलगती गोलंदाजीत भारतीय संघाचा किंग ठरला आहे. 

टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी जलगती गोलंदाज

दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील क्लासेन आणि डेविड मिलर ही मंडळी आउट झाल्यावर भारतीय संघ सामना अगदी सहज जिंकेल, असे वाटत होते. पण मार्को यान्सेन यानं  भारताविरुद्ध अवघ्या १६ चेंडूत सर्वात वेगवान T20I अर्धशतक झळकावत सामन्यात रंगत आणली. हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकात मार्कोनं तुफान फटकेबाजी करत २६ धावा कुटल्या. अर्शदीप सिंगनं अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत त्याचा खेळ खल्लास केला. या विकेटसह अर्शदीप सिंगच्या खात्यात या सामन्यात तिसरी विकेट जमा झाली. ३७ धावा खर्च करून त्याने ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. यासोबतच तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी जलगदती गोलंदाज ठरला आहे.

भुवनेश्वरला  मागे टाकत नाव किंग ठरला अर्शदीप सिंग

अर्शदिप सिंगनं आपल्या छोट्याशा कारकिर्दीत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो भुवनेश्वर कुमारला मागे टाकत आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा जलदगती गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारच्या खात्यात ८७ सामन्यात ९० विकेट्स आहेत. अर्शदिप सिंगनं ५९ सामन्यात ९१ विकेट्सचा पल्ला गाठत भुवीला मागे टाकले. टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा युझवेंद्र चहलच्या नावे आहे. त्याने ८० सामन्यात ९६ विकेट्स घेतल्या आहेत. हा रेकॉर्डही आता अर्शदीपच्या टप्प्यात आहे.

T20I मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे आघाडीचे ५ गोलंदाज 

युझवेंद्र चहल – ८० सामन्यात ९६ विकेट्स
अर्शदीप सिंग – ५९ सामन्यात ९२ विकेट
भुवनेश्वर कुमार – ८७ सामन्यात ९० विकेट्स
जसप्रीत बुमराह – ७० सामन्यात ८९ विकेट्स
 

Web Title: IND vs SA Arshdeep Singh Overtake Bhuvneshwar Kumar And Hold Record Become Indian Pacer With Most Wickets In T20Is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.