Join us  

IND vs SA Boxing Day Test: खेळपट्टी पाहून श्रेयस अय्यरला धक्का बसला, राहुल द्रविडच्या एका वाक्यानं संपूर्ण संघाला धीर मिळाला... Video 

IND vs SA Boxing Day Test: भारतीय संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज होत आहे. आफ्रिकेत पोहोचल्यानंतर क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण करून टीम इंडियाचे खेळाडू नेट्समध्ये सराव करताना दिसत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:53 AM

Open in App

IND vs SA Boxing Day Test: भारतीय संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज होत आहे. आफ्रिकेत पोहोचल्यानंतर क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण करून टीम इंडियाचे खेळाडू नेट्समध्ये सराव करताना दिसत आहेत. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आदींना दक्षिण आफ्रिका नवा नाही, परंतु श्रेयस अय्यरसाठी ( Shreyas Iyer) हा अनुभवी भविष्यात कामी येणार आहे. कसोटी संघात नुकताच पदार्पण करणारा श्रेयस सुपर स्पोर्ट्स पार्कवरील खेळपट्टीपाहून सदम्यात गेला. पहिल्या कसोटी ज्या मैदानावर खेळवली जाणार आहे, तेथील खेळपट्टीवर अधिकचे गवत पाहून श्रेयसला धक्का बसला आहे. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्या  एका वाक्यानं टीम इंडियाला धीर मिळाला. 

भारतीय संघ सोमवारी सुपर स्पोर्ट्स पार्कवर सरावासाठी दाखल झाला. खेळपट्टी पाहिल्यानंतर अय्यर म्हणाला,''या खेळपट्टीवर खूप गवत आहे. येथे फलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे.'' सराव सुरू करण्यापूर्वी द्रविडनं एकच मंत्र दिला आणि तो म्हणजे, मोकळ्या मनानं क्वालिटी सराव करा.'' त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना धीर मिळाला. BCCIनं पोस्ट केलेल्या या व्हिडीओत अय्यरनं संघातील अनुभवी गोलंदाज इशांत शर्मालाही खेळपट्टीबाबत विचारले. त्यावर तो म्हणाला, या खेळपट्टीवर चेंडू प्रचंड वळणार आहे. फलंदाजी करताना अवघड जाणार आहे.  

दोन्ही संघांच्या फलंदाजांना या खेळपट्टीवर खेळणे आव्हानात्मक असेल. आफ्रिकेकडे कागिसो रबाडा, अॅनरिच नॉर्ट्ज हे वेगवान मारा करणारे गोलंदाज आहेत, तर टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी  हे स्टार आहेत. ''येथे गोलंदाजांनाही आव्हान असणार आहे. त्यांना त्यांच्या लेंथवर बरंच काम करावं लागेल,''असे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे म्हणाला. 

या मैदानावर दक्षिण आफ्रिकेनं २६ कसोटी सामन्यांत २१ विजय मिळवले आहेत, तर ३ सामने ड्रॉ झाले. २०१४मध्ये ऑस्ट्रेलियानं येथे त्यांना शेवटचं नमवलं होतं.   

भारतीय संघ -विराट कोहली ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाराहुल द्रविडश्रेयस अय्यरइशांत शर्मा
Open in App