India vs South Africa 1st T20I : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात इशान किशनने ( Ishan Kishan) दमदार खेळ केला. त्याच्या ७६ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने २११ धावांचा डोंगर उभा केला. पण, डेव्हिड मिलर व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांच्या नाबाद १३१ धावांच्या भागीदारीने भारताचा पराभव केला.
इशान किशनने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा करून भारताचा पाया मजबूत केला. ऋतुराज गायकवाड ( २३), श्रेयस अय्यर ( ३६), रिषभ पंत ( २९) व हार्दिक पांड्या ( ३१*) यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या षटकात कर्णधार टेम्बा बवुमाची ( १०) विकेट जरी गमावली असली तरी त्यांनी ४.४ षटकांत फलकावर अर्धशतक झळकावले. ड्वेन प्रेटोरियसचा ( २९) व क्विंटन डी कॉक ( २२) हे माघारी परतल्यानंतर डेव्हिड मिलर व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी दमदार फटकेबाजी केली.
पण, उल्लेखनीय फलंदाजी करूनही इशानला संघातील स्थान असुरक्षित वाटत आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांच्या पुनरागमनानंतर इशानला अंतिम ११मध्ये खेळण्याची संधी मिळणे अवघड आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली आहे, तर लोकेश राहुलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. पहिल्या सामन्यानंतर इशान म्हणाला,'' रोहित व लोकेश हे वर्ल्ड क्लास खेळाडू आहेत आणि माझ्यासाठी त्यांनी संघाबाहेर बसण्यास मी सांगू शकत नाही. अशावेळी सराव सत्रात सर्वोत्तम देण्याचं माझं काम आहे. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा स्वतःला सिद्ध करण्याचं किंवा संघासाठी चांगली कामगिरी करण्याची माझी जबाबदारी आहे. त्यावर मी लक्ष केंद्रीत केले आहे.''
तो पुढे म्हणाला,'' त्यांनी संघासाठी बरंच केलं आहे. त्यांनी देशासाठी किती धावा केल्यात, हे सर्वांना माहित्येय. त्यामुळे मला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी त्यांना वगळण्यास मी सांगू शकत नाही. मी माझं काम करत राहणार. खेळवायचं की नाही या गोष्टीचा विचार निवड समिती व प्रशिक्षकांनी करावा