Join us

IND vs SA : फलंदाज अन् गोलंदाज दोघेही तेच; फिल्डर बदलला पण रिझल्ट तोच! (VIDEO)

अक्षर पटेलनं हवेत उडी मारत पकडला अफलातून कॅच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:19 IST

Open in App

Axar Patel Took A Surprising Catch Of David Miller : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. पहिल्या ३ सामन्यातील दोन सामने जिंकत भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलीये. सेंच्युरीयनच्या मैदानात रंगलेला तिसरा टी-२० सामना अगदी रंगतदार झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर डेविड मिलरच्या रुपात मिळालेली विकेट सामन्यातील एक टर्निंग पाइंटच होता. अक्षर पटेलनं सीमारेषेजवळ अफलातून झेल टिपल्याचे पाहायला मिळाले. या कॅचमुळं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमधील त्या मॅच विनिंग कॅचच्या आठवणीला उजाळा मिळाला आहे. 

सूर्याचा तो झेल आठवतोय ना?

२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघातच फायनल रंगली होती. भारतीय संघाने सेट केलेल्या टार्गेट दक्षिण आफ्रिकेचा संघ अगदी सहज पार करेल, असे वाटत होते. पण  त्यावेळी सूर्यकुमार यादवनं जबरदस्त कॅच घेतला आणि मॅच टीम इंडियाच्या बाजूनं फिरली होती. ज्याचा कॅच घेतलो तो होता किलर खेळीनं सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारा डेविड मिलर. त्यावेळी गोलंदाजी मार्कवर होता तो हार्दिक पांड्या.

सेंच्युरियनच्या मैदानात पुन्हा क्रिएट झाला टी-२० वर्ल्ड कप फायनलसारखा सीन

हाच सीन पुन्हा रिक्रिट झाल्याचे पाहायला मिळाले. सेंच्युरियनच्या मैदानात फक्त फिल्डर बदलला. तोच फलंदाज अन् गोलंदाजही तोच फिल्डर बदलला पण रिझल्ट मात्र सेम भारतीय संघाच्या फायद्याचा. असा काहीसा हा सीन होता. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानं १६ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या हाती चेंडू सोपवला. 

नेमक काय घडलं?

हार्दिक पांड्या गोलंदाजीला आल्यावर त्याने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. १६ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर डेविड मिरलनं एक उत्तुंग फटका मारला. हा फटका थेट सीमारेषेबाहेर जाऊन टीम इंडियाचे टेन्शन आणखी वाढेल, असेच वाटत होते. पण अक्षर पटेलनं हवेत उडी मारत सुपरमॅनच्या तोऱ्यात कमालीची झेल पकडून हा फटका निर्थक ठरवला. त्याचा हा झेल सर्वोत्तम झेलपैकी एक आहे. सोशल मीडियावर सध्या या झेलची चांगलीच चर्चा रंगताना दिसते.

टॅग्स :अक्षर पटेलसूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्याटी-20 क्रिकेटद. आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ