IND vs SA : भारताची 'विराट' धावसंख्या! किंग कोहलीच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर

ICC ODI World Cup 2023 : आज वन डे विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 06:00 PM2023-11-05T18:00:02+5:302023-11-05T18:00:15+5:30

whatsapp join usJoin us
 IND vs SA in ICC ODI World Cup 2023 Virat Kohli scored 101 runs for his 49th ODI century and equaled Sachin Tendulkar's world record as India set a target of 327 runs to win against South Africa | IND vs SA : भारताची 'विराट' धावसंख्या! किंग कोहलीच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर

IND vs SA : भारताची 'विराट' धावसंख्या! किंग कोहलीच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA Live Match Updates | कोलकाता : दिग्गज, किंग कोहली, शतकांचा सम्राट, रनमशीन अशा विविध नावांनी जगभर ओळख असलेल्या विराट कोहलीने पुन्हा एकदा क्रिकेटचा बादशाह असल्याचे दाखवून दिले. आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर  सामना होत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी स्फोटक सुरूवात केली. पण, भारतीय सलामीवीरांना माघारी धाडण्यात आफ्रिकन गोलंदाजांना यश आले. मग त्यानंतर सुरू झाला तो 'विराट' खेळीचा शो. किंग कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करत वन डे मध्ये ४९ शतके झळकावण्याचा भीमपराक्रम केला. विराटने सावध खेळी करत शतकाला गवसणी घातली. त्याने १० चौकारांच्या मदतीने १२० चेंडूत शतक ठोकून तमाम भारतीयांना वाढदिवशी भेट दिली. भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३२६ धावा केल्या असून दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३२७ धावांची आवश्यकता आहे. विराटने नाबाद १०१ धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे लक्ष्य उभारले. 

कर्णधार रोहित शर्मा (४०) आणि शुबमन गिल (२३) यांनी चांगली सुरूवात केली पण भारतीय कर्णधार बाद होताच भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. सावध खेळी करत असलेल्या गिलला केशव महाराजने आपल्या जाळ्यात फसवले. मग किंग कोहलीने मोर्चा सांभाळला अन् श्रेयस अय्यरसोबत डाव पुढे नेला. अय्यरने ८७ चेंडूत ७७ धावांची अप्रतिम खेळी करून भारताची धावसंख्या ३०० पार पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण लुंगी एनगिडीने त्याला बाद केले अन् भारताला तिसरा झटका बसला. त्यानंतर लोकेश राहुल (८) आणि सूर्यकुमार यादव (२२) यांनी विराटला साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. अखेरच्या काही षटकांत रवींद्र जडेजाने १५ चेंडूत २९ धावांची चांगली खेळी करून शतकवीर कोहलीला साथ दिली. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पाच क्रमांकाच्या खेळपट्टीवर खेळला जात आहे. याच खेळपट्टीवर बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना खेळला गेला, जो कमी धावसंख्येचा होता. या सामन्यात २३० धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १४२ धावांत सर्वबाद झाला आणि नेदरलँडसने ८७ धावांनी सामना आपल्या नावावर केला. 

Web Title:  IND vs SA in ICC ODI World Cup 2023 Virat Kohli scored 101 runs for his 49th ODI century and equaled Sachin Tendulkar's world record as India set a target of 327 runs to win against South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.