IND vs SA 1st Test: सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. खरं तर आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड ठोठावला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या १० टक्के दंड भरावा लागणार आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील दोन गुण देखील कमी झाले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील सलामीचा सामना सेंच्युरियन येथे खेळवला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दोन षटके कमी टाकली. यामुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून दोन गुण वजा करण्यात आले आहेत. यासोबतच आयसीसीने मॅच फीच्या १० टक्के दंडही ठोठावला आहे. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफरीच्या क्रिस ब्रॉड यांनी भारताला दोन षटके उशीराने टाकल्यामुळे हा दंड ठोठावला.
ICC ने दंड ठोठावला
आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखादा संघ निर्धारित वेळेत ठराविक षटके टाकू शकला नाही, तर तो स्लो ओव्हर रेटमुळे दंडास पात्र ठरतो. अशा स्थितीत खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन षटके कमी टाकली. यामुळे भारताला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय संघ आताच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. मॅच फीसह त्यांचे २ गुणही कमी झाले आहेत. तर, दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. याशिवाय पाकिस्तान दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या तर बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे.
Web Title: IND vs SA India have been fined 10 per cent of their match fee and penalised two ICC World Test Championship points for maintaining a slow over-rate against South Africa in the first Test in Centurion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.