IND vs SA: "इथं कोणीही करू शकलं नाही तेच करायचंय", आफ्रिकेत भारताची 'कसोटी' पण रोहित सज्ज

ind vs sa test series : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे मंगळवारपासून कसोटी मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 04:09 PM2023-12-25T16:09:53+5:302023-12-25T16:10:24+5:30

whatsapp join usJoin us
ind vs sa indian captain Rohit Sharma said, Want to achieve what nobody has achieved in this part of the world on eve of first Test against South Africa  | IND vs SA: "इथं कोणीही करू शकलं नाही तेच करायचंय", आफ्रिकेत भारताची 'कसोटी' पण रोहित सज्ज

IND vs SA: "इथं कोणीही करू शकलं नाही तेच करायचंय", आफ्रिकेत भारताची 'कसोटी' पण रोहित सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंच्युरियन : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे मंगळवारपासून कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. खरं तर आतापर्यंत भारताला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकता आली नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघासमोर मोठे आव्हान असेल. याशिवाय मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी देखील असणार आहे. सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपली रणनीती स्पष्ट करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

रोहितने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत भारताला अद्याप विजय मिळवता आला नाही. त्यामुळे मला जगातील या भागात कोणीही जे साध्य केले नाही ते साध्य करायचे आहे. मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळणार नाही याची कमी आम्हाला भासेलच... पण दुसरा कोणता गोलंदाज ही कमी भरून काढले अशी आशा आहे. पण ते काम सोपे असणार नाही. रोहित पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत बोलत होता. 

तसेच भारताचा महिला क्रिकेट संघ चांगली कामगिरी करतो आहे हे पाहून आनंद झाला. त्यांनी कसोटी सामन्यांमध्ये केलेली कामगिरी अप्रतिम आहे. मला आशा आहे की, महिला संघ आगामी काळात आणखी कसोटी क्रिकेट खेळेल. आम्ही अद्याप आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलो नाही. जर यावेळी जिंकलो तर विश्वचषकातील पराभवाची झळ भरून निघेल असे मी म्हणणार नाही. कारण तो पराभव आणि या मालिकेची तुलना होऊ शकत नाही, असेही रोहित शर्माने सांगितले. 

ट्वेंटी-२० विश्वचषकाबद्दल सूचक विधान 
रोहित शर्मा विश्वचषकातील पराभवानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी बोलला. यावेळी तो निराश आणि हताश दिसला. आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकण्याचे आव्हान असल्याचे त्यांच्या तोंडावर स्पष्टपणे दिसत होते. अशातच पत्रकाराने त्याला प्रश्न केला की, जेव्हा तू निराशेबद्दल बोलत असतो तेव्हा तुला ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकायचा आहे असे म्हणायचे असते का? यावर रोहितने मिश्किलपणे म्हटले, "मला माहिती आहे तू माझ्याकडून काय शोधत आहेस, तुला काय उत्तर हवं आहे याची मला कल्पना आहे. तुला लवकरच उत्तर मिळेल." 

कसोटी मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरन, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा. 

मालिकेचे वेळापत्रक 
२६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून (सेंच्युरियन)
३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून  (केपटाउन)

Web Title: ind vs sa indian captain Rohit Sharma said, Want to achieve what nobody has achieved in this part of the world on eve of first Test against South Africa 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.