IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ( Dean Elgar) याला जीवदान मिळालं. आर अश्विनच्या गोलंदाजीवर पंच मराईस इरास्मस यांनी एल्गरला LBW बाद दिले. अश्विननं टाकलेला चेंडू एल्गरच्या पॅडवर गुडघ्याखाली आदळला अन् पंचांनी त्याला बाद दिले. पण, एल्गरनं DRS घेतला आणि बॉल-ट्रॅकिंग मध्ये चेंडू स्टम्प्सच्या वरून जात असल्याचे दिसले. त्यानंतर मैदानावरील अम्पायरना निर्णय बदलावा लागला व एल्गर नाबाद राहिला. पण, ९ षटकानंतर एल्गरला माघारी जावं लागलं. एल्गर व किगन पीटरसन यांनी ४१ धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितित आणून ठेवले होते.
तिसऱ्या अम्पायरच्या या निर्णयानंतर मात्र भारतीय खेळाडू खवळले. कर्णधार विराट कोहली, आर अश्विन आणि उप कर्णधार लोकेश राहुल यांनी शाब्दिक मारा केला. या प्रकरणावर एल्गरनं सामन्यानंतर मौन सोडले. तो म्हणाला,''मला ते आवडलं, कारण ते वागणं आमच्या पथ्यावर पडलं. त्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली गेला आणि आपल्याला हवं ते होत नाहीय असं त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे जिंकण्याचे प्रयत्नच करणे सोडले. त्यामुळे सामना आमच्या हातात आला. भारतीय संघ खेळणंच विसरला होता आणि ते प्रचंड भावनिक झाले होते. त्यामुळे तो प्रसंग घडला याचा मला खूप आनंद झाला.''
या कसोटीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आर अश्विननं टाकलेल्या २१व्या षटकातील एक चेंडू दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरच्या पॅडवर आदळला अन् सर्वांना जोरदार अपील केले. मैदानावरील पंच एराम्सस यांनी लगेच बोट वर केले. मोठी विकेट मिळाली म्हणून भारतीय खेळाडू आनंदात होते. पण, एल्गरनं लगेच DRS घेतला. चेंडू यष्टींवर आदळत असल्याचा विश्वास सर्वांनाच होता, पण रिप्लेत चेंडू स्टम्प्सच्या वरून जाताना दिसला अन् एराम्सस यांना निर्णय बदलावा लागला. त्यावेळेस त्यांनीही हे शक्य नाही अशीच प्रतिक्रिया दिली.
विराट मात्र संतापला अन् षटक संपल्यानंतर स्टम्प्स माईककडे जाऊन बडबडला. तो म्हणाला, ''तुमचा संघ जेव्हा चेंडू चमकवतात तेव्हा त्यांच्यावरही लक्ष ठेव, फक्त प्रतिस्पर्धी संघावर नको. लोकांचं लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न करत असतोस.'' उप कर्णधार लोकेश राहुल हाही तेव्हा म्हणाला की, संपूर्ण देश मिळून ११ खेळाडूंविरुद्ध खेळतोय. आणि अश्विन म्हणाला, जिंकण्यासाठी कोणतातरी दूसरा मार्ग शोधा, सुपरस्पोर्ट्स
Web Title: IND vs SA : India's displeasure with the DRS system worked in South Africa's favour, according to the host captain Dean Elgar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.