IND vs SA: भारताची सलामीवीर स्मृती मंधानाच्या डोक्यावर आदळला चेंडू, त्वरित सोडावं लागलं मैदान   

Smriti Mandhana: भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये सुरू असलेल्या सराव सामन्यात धक्कादायक घटना घडली आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजीदरम्यान, भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिच्या डोक्यावर एक उसळता चेंडू आदळला. त्यानंतर तिने त्वरित मैदान सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 12:16 PM2022-02-27T12:16:13+5:302022-02-27T12:16:49+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA: India's opener Smriti Mandhana hit the ball on the head, had to leave the field immediately | IND vs SA: भारताची सलामीवीर स्मृती मंधानाच्या डोक्यावर आदळला चेंडू, त्वरित सोडावं लागलं मैदान   

IND vs SA: भारताची सलामीवीर स्मृती मंधानाच्या डोक्यावर आदळला चेंडू, त्वरित सोडावं लागलं मैदान   

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन - काही दिवसांवर आलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी सध्या सराव सामने सुरू आहेत. दरम्यान, आज भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये सुरू असलेल्या सराव सामन्यात धक्कादायक घटना घडली आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजीदरम्यान, भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिच्या डोक्यावर एक उसळता चेंडू आदळला. त्यानंतर तिने त्वरित मैदान सोडले.

सामन्याच्या सुरुवातीलाच स्मृती मंधाना शबनीम इस्माईलच्या उसळत्या चेंडूवर जखमी झाली. त्यानंतर तिला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. बाऊन्सर चेंडू लागल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून ती फलंदाजी करण्यासाठी फिट असल्याचे सांगितले मात्र अजून एका सल्ल्यानंतर ती रिटायर्ड हर्ट झाली.

मेडिकल स्टाफने दिलेल्या माहितीनुसार तिच्यामध्ये कनकशनची लक्षणे दिसून आली नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून तिने सामना अर्ध्यावरून सोडला. या सामन्यात भारतीय संघाने ५० षटकांमध्ये ९ बाद २४४ धावा केल्या. भारताकडून हरमनप्रीत सिंहने शानदार शकती खेळी केली. तिने ११४ चेंडूत १०३ धावा फटकावल्या.

दरम्यान, काल झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात भारताचा सलामीवीर इशान किशन याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता आणि प्राथमिक उपचार घेऊन तो मैदानावर खेळला. पण, सामन्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. इशान किशनला धरमशाला येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आयसीयू वॉर्डात दाखल केले गेले आहे. तेथे सीटी स्कॅन केल्यानंतर त्याला आयसीयू वॉर्डात भरती केलं गेलं होतं. पण, त्यात घाबरण्यासारखं काही नसल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. इशानला आता साध्या वॉर्डात हलवण्यात आले आहे. भारताच्या डावातील चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशानला दुखापत झाली. लाहिरू कुमाराने टाकलेला बाऊन्सर थेट इशानच्या हेल्मेटवर आदळला आणि त्यानंतर तो मैदानावर बसला. प्राथमिक उपचार घेऊन त्याने पुन्हा फलंदाजी केली. मात्र, १५ चेंडूंत १६ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर इशानला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे वृत्त दैनिक जागरणने दिले होते. 

Web Title: IND vs SA: India's opener Smriti Mandhana hit the ball on the head, had to leave the field immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.