IND vs SA 1st ODI | जोहान्सबर्ग : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वन डे सामना खेळवला जात आहे. ट्वेंटी-२० मालिका बरोबरीत (१-१) संपल्यानंतर टीम इंडियासमोर वन डे मालिका जिंकण्याचे आव्हान आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात आहे. आजच्या सामन्यातून साई सुदर्शन पदार्पण करत आहे. आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यजमान संघ भारतासमोर 'लक्ष्य' ठेवेल.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.
आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झॉर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी.
वन डे मालिकेतील पहिला सामना आज जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर होत आहे. या सामन्याला 'पिंक वन डे' असे नाव देण्यात आले असून यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरेल. स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे हा यामागील उद्देश आहे. या मालिकेत लोकेश राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या हाती आहे. वन डे मालिकेत भारताने आपल्या वरिष्ठ आणि महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली आहे.