India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक यानं सेंच्युरियन येथील भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीनंतर तडकाफडकी निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यानंतर क्विंटन डी कॉक तसाही घरी परतणार होता. तो प्रथमच बाबा बनणार आहे आणि त्यासाठी त्यानं मालिकेतून माघार घेण्याचं कळवलं होतं. पण, तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. आता तो कुटुंबियांना वेळ दतोय आणि नव वर्षाच्या पूर्वसंध्येला त्यानं मासेमारी केली आणि त्याच्या गळाला चक्क मोठा मासाही लागला. क्विंटननं सोशल मीडियावर त्यानं पकडलेल्या मोठ्या मास्यासह फोटो पोस्ट केलेत.
२९ वर्षीय क्विंटननं २०१४मध्ये कसोटीत पदार्पण केलं. त्यानं ५४ सामन्यांत ३३०० धावा केल् या आहेत. १४१ नाबाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असून त्याच्या नावावर ६ शतकं व २२ अर्धशतकं आहेत.
क्विंटन डी कॉकची पत्नी साशा प्रेग्नेंट आहे आणि या महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे क्विंटन पहिल्या कसोटीनंतर माघार घेणारच होता. भारतीय संघानं पहिल्या कसोटीत ११३ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर तासाभरातच क्विंटननं कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. ''हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. बराच वेळ मी भविष्याचा विचार केला आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला. सध्या माझ्या आयुष्यात साशलाला वेळ देणं हे प्राधान्य आहे,''असे क्विंटननं सांगितले होते.
याआधीही त्यानं मासेमारीचे फोटो पोस्ट केले आहेत...