IND Vs SA: रहाणे, पुजाराने दाखवला दम; पण एल्गरही भिडला

कसोटी रंगतदार अवस्थेत, भारताला विजयासाठी ८ बळींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:46 AM2022-01-06T05:46:58+5:302022-01-06T05:48:24+5:30

whatsapp join usJoin us
IND Vs SA: Rahane, the pujara showed breath; But Elgar also struggled | IND Vs SA: रहाणे, पुजाराने दाखवला दम; पण एल्गरही भिडला

IND Vs SA: रहाणे, पुजाराने दाखवला दम; पण एल्गरही भिडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहान्सबर्ग : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची शतकी भागीदारी आणि हनुमा विहारीची उपयुक्त खेळी या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, यजमान संघाने तिसऱ्या दिवशी बुधवारी खेळ संपला तेव्हा दोन बाद ११८ धावा केल्या होत्या. कर्णधार डीन एल्गरने ४६ धावा करून सामना रोमांचक स्थितीत नेला.

दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही लक्ष्याच्या १२२ धावांनी मागे आहे.  भारताने दुसऱ्या डावात २६६ धावा केल्या. आफ्रिकेने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली होती. या मैदानात सर्वांत मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्यांनी २०११ मध्ये ३१० धावांचे लक्ष्य गाठले होते. एडन मार्क्रम (३१ धावा) आणि कर्णधार डीन एल्गर यांनी सहज सुरुवात केली. दोघांनी ४७ धावांची भागीदारी केली. शार्दुल ठाकूर याने मार्क्रमला बाद केले. त्यानंतर आर. अश्विन याने किगन पिटरसन (११ धावा) याला बाद केले.  

n पुजारा याने ५३, तर रहाणेने ५८ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २३.२ षटकांत १११ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर विहारी याने नाबाद ४० धावा करत तळाच्या फलंदाजांसोबत ८२ धावा जोडल्या. त्यात शार्दुल ठाकूर (२८ धावा) नेही योगदान दिले. पहिल्या सत्रात रबाडाने तीन बळी घेत दक्षिण आफ्रिकेला पुनरागमन करून दिले. मार्को जेन्सन आणि लुंगी एनगिडी यांनी त्याचा फायदा घेतला.

n सकाळच्या सत्रात पुजारा आणि रहाणे यांनी धावा केल्या. रहाणेने ८ चौकार आणि एक षट्कार लगावला, तर पुजाराने १० चौकार लगावले. भारत दोन बाद १५५ अशा चांगल्या स्थितीत असताना रबाडाने आफ्रिकेला पुनरागमन करून दिले. पुजारा आणि रहाणे बाद झाल्यावर पंत चुकीचा फटका मारून बाद झाला. अश्विनला एनगिडीने बाद केले. ठाकूरने आकर्षक शॉट लगावले. 

मैदानावरच भिडले बुमराह-जेन्सन
n जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेलाच जलदगती गोलंदाज 
मार्को जेन्सन यांच्यात चांगलाच वाद झाला. 
n भारताच्या डावात ५४ व्या षटकांत जेन्सनने एक बाऊन्सर टाकला. तो बुमराहच्या खांद्याला लागला. त्यानंतर पुन्हा असे झाले. त्यानंतर दोघेही एकमेकांशी बोलले आणि तेवढ्यात पंचांनी हस्तक्षेप केला.

धावफलक
भारत पहिला डाव : सर्वबाद २०२, 
द. आफ्रिका पहिला डाव : सर्वबाद २२९.
भारत दुसरा डाव: लोकेश राहुल झे. मार्कराम गो जेन्सन ८, मयंक अग्रवाल पायचित गो. ऑलिव्हर २३, चेतेश्वर पुजारा पायचित गो. रबाडा ५३, अजिंक्य रहाणे झे. वेरेयन्ने गो. रबाडा ५८, हनुमा विहारी नाबाद ४०, ऋषभ पंत झे. वेरेयन्ने गो. रबाडा ०, रविचंद्रन अश्विन झे. वेरेयन्ने गो. एन्गिडी १६, शार्दुल ठाकूर झे. महाराज गो. जेन्सन २८, मोहम्मद शमी झे. वेरेयन्ने गो. जेन्सन ०, जसप्रीत बुमराह झे. जेन्सन गो. एन्गिडी ७. अवांतर : ३३, एकूण : ६०.१ षटकात सर्वबाद २६६ धावा. बाद क्रम: १-२४, २-४४, ३-१५५, ४-१६३, ५-१६७, ६-१८४, ७-२२५, ८-२२८, ९-२४५, १०-२६६. 
गोलंदाजी: रबाडा २०-३-७७-३, ऑलिव्हर १२-१-५१-१, एन्गिडी १०.१-२-४३-३, जेन्सन १७-४-६७-३, केशव महाराज १-०-८-०.
द. आफ्रिका दुसरा डाव : एडन मार्कक्रम पायचित गो. ठाकूर ३१, डीन एल्गर खेळत आहे ४६, किगन पीटरसन पायचित गो. अश्विन २८, वॅन डे दुसेन खेळत आहे ११. अवांतर - २, एकूण : ४० षटकांत २ बाद ११८. गडी बाद क्रम : १-४७, २-९३. गोलंदाजी : जसप्रीत बुमराह १०-१-४२-०, मोहम्मद शमी ९-२-२२-०, शार्दुल ठाकूर ९-१-२४-१, मोहम्मद सिराज ४-०-१४-०, रविचंद्रन अश्विन ८-१-१४-१.

Web Title: IND Vs SA: Rahane, the pujara showed breath; But Elgar also struggled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.