India vs South Africa ODI Series: आशिया चषक २०२२ स्पर्धेतील निराशाजन कामगिरीनंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मध्ये दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आणखी सराव मिळावा यासाठी BCCI ने दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांना मायदेशात बोलावले. आता ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ या दोन तगड्या संघांशी प्रत्येकी ३ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ वन डे सामन्यांची मालिका होणार आहे आणि त्यात शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्याकडे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. ANI ने तसे वृत्त दिले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना या वन डे मालिकेत विश्रांती दिली जाईल, असेही चित्र आहे. VVS Laxman या मालिकेसाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पाहणार आहेत. ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी वन डे मालिका खेळवण्याचा काहीच अर्थ नाही, परंतु आता ती खेळावी लागले. रोहित, विराट आणि जे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाचे सदस्य असतील त्यांना वन डे मालिकेत विश्रांती दिली जाईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना शॉर्ट ब्रेकही मिळेल. शिखर धवन वन डे संघाचे नेतृत्व करेल,''असे BCCI च्या सूत्रांनी ANI ला सांगितले.
भारतीय संघ ६ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. सहा दिवसांनी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी सराव सामना खेळणार आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. १७ ऑक्टोबरला भारताचा सराव सामना आहे. रोहित शर्मा अँड टीम ९ किंवा १० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. सात दिवस आधी ऑस्ट्रेलियात दाखल होण्याने भारतीय खेळाडूंना तेथील वातावरण व वेळेशी जुळवून घेण्यास मदत होईल. सराव सामन्याआधी भारतीय संघ आंतर-संघ सामने खेळतील. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंची वन डे मालिकेसाठी निवड होईल.
शिखर धवनकडे पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवलं जाण्याची दाट शक्यता आहे. राहुल त्रिपाठीला यंदातरी पदार्पणाची संधी मिळणे अपेक्षित आहे. उम्रान मलिकचा वन डे मालिकेसाठी विचार केला जाऊ शकतो. पण, जर राहुल द्रविडने संघाला वन डे चा सराव मिळावा, असा प्लान केल्या, यात बदल होऊ शकतो. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांना अधिकाधिक सराव मिळण्याची गरज आहे. रोहित, विराट व हार्दिकला विश्रांती मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेचा संघही ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी ही वन डे मालिका खेळणार आहे. त्यांचाही पहिला सराव सामना १७ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वन डे संघ - South Africa ODI Squad: टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी ( Temba Bavuma (captain), Quinton de Kock, Reeza Hendricks, Heinrich Klaasen, Keshav Maharaj, Janneman Malan, Aiden Markram, David Miller, Lungi Ngidi, Anrich Nortje, Wayne Parnell, Andile Phehlukwayo, Dwaine Pretorius, Kagiso Rabada, Tabraiz Shamsi)
वन डे मालिकेचे वेळापत्रक IND vs SA ODI Schedule:पहिली वन डे - ६ ऑक्टोबर, रांचीदुसरी वन डे - ९ ऑक्टोबर, लखनौतिसरी वन डे - ११ ऑक्टोबर, दिल्ली