IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-१ असा विजय मिळवला. आता दक्षिण आफ्रिका दौरा गाजवण्यासाठी सूर्यकुमार अँड टीम सज्ज झाली आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार करणार आहे आणि त्याला आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहलीचा ( Virat Kohli) मोठा विक्रम तोडण्यासाठी केवळ १५ धावा करण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वात जलद २००० धावांचा विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी सूर्यकुमार यादवकडे आहे.
सूर्याने ५५ इनिंग्जमध्ये १९८५ धावा केल्या आहेत आणि आफ्रिकेविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२०त १५ धावा करताच तो भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये ट्वेंटी-२०त २००० धावा करणारा फलंदाज बनेल. विराटने ५६ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला आहे. पाकिस्तानचा बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी ५२ इनिंग्जमध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त हा पराक्रम केला आहे. भारतीयांमध्ये लोकेश राहुल ( ५८) व रोहित शर्मा ( ७७) हेही या विक्रमाच्या यादीत येतात.
इंग्लंडविरुद्ध २०२१ मध्ये पदार्पण केल्यानंतर सूर्यकुमारने या फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवले आहे. ३३ वर्षीय फलंदाज ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याने ५८ ट्वेंटी-२०मध्ये १६ अर्धशतकं व ३ शतकं झळकावली आहेत. त्याची धावांची सरासरी ही ४४.११ आहे, जी भारतीय फलंदाजांमध्ये दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे. ट्वेंटी-२० मालिका
१० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून१४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून
वन डे मालिका१७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून
कसोटी मालिका२६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून