दक्षिण ऑफ्रिकेविरुद्धच्या टी -२० सीरीजच्या पूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. पीटीआयनुसार टीम इंडियाचे दोन तगडे प्लेयर जायबंदी झाल्याने बाहेर पडले आहेत. ऑस्ट्रेलियासोबतच्या अटीतटीच्या लढतीत विजय मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याला बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. यामुळे भारतीय संघाला द. आफ्रिकेसोबत झगडावे लागण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्याच्या जागी स्पिन ऑलराऊंडर शाहबाज अहमद याची एन्ट्री झाली आहे. दर दीपक हुड्डाच्या जागी श्रेयस अय्यरची व शमीच्या जागी उमेश यादवला संधी मिळाली आहे. उमेश यादव थिरुवअनंतपुरमला पोहोचला आहे. शमीच्या जागी उमेश यादवला ऑस्ट्रेलिया सीरीजमध्ये संधी मिळाली होती. आफ्रिकेची टीम रविवारीच केरळमध्ये दाखल झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'शमी कोविड-19 मधून बरा झालेला नाही. त्याला आणखी वेळ हवा आहे आणि त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून बाहेर असेल. दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी शमीच्या जागी उमेश यादव संघात राहील.हार्दिकची जागा घेऊ शकेल असा कोणी वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे का? राज बावा यांच्याकडे फारच कमी अनुभव आहे आणि म्हणूनच त्यांना अनुभव देण्यासाठी आम्ही त्याला भारत अ संघात ठेवले आहे. त्याला तयार होण्यासाठी थोडा वेळ हवा आहे., असे त्यांनी सांगितले.
विश्वचषकासाठी मोहम्मद शमी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मोहम्मद शमी हा विश्वचषकासाठी बीसीसीआयने निवडलेल्या चार स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. UAE मध्ये झालेल्या गेल्या विश्वचषकानंतर शमीने एकही T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका:पहिली T20 - 28 सप्टेंबर (थिरुवनंतपुरम)दुसरी T20 - 2 ऑक्टोबर (गुवाहाटी)तिसरी टी२० - ४ ऑक्टोबर (इंदूर)पहिली वनडे - ६ ऑक्टोबर (लखनौ)दुसरी वनडे - ९ ऑक्टोबर (रांची)तिसरी एकदिवसीय - 11 ऑक्टोबर (दिल्ली)