Umran Malik Team India, IND vs SA T20 Series: IPL 2022 च्या हंगामानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ९ जूनपासून ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. तर लोकेश राहुलला संघाचा कर्णधार करण्यात आले. या मालिकेच्या निमित्ताने टी२० संघात हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल या खेळाडूंचे पुनरागमन झाले. पण विशेष बाब म्हणजे IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनाही प्रथमच संघात स्थान मिळाले. उमरानने आपल्या वेगाने साऱ्यांनाच थक्क केले. त्याच्या या वेगवान गोलंदाजीमुळे मालिका सुरू होण्याआधीच आफ्रिकन कर्णधाराची हवा टाईट झाल्याचे दिसून आलं.
काय म्हणाला आफ्रिकन कर्णधार?
आफ्रिकन संघ भारत दौऱ्यासाठी निघण्याआधी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याने माध्यमांशी संवाद साधला. "उमरान मलिक भारतीय संघातील एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. आम्ही आफ्रिकन पिचवर वेगवान गोलंदाजी खेळतच लहानाचे मोठे झालो आहोत. पण आफ्रिकेत कोणताही गोलंदाज सतत ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करत असेल असं मला वाटत नाही. आमच्याकडेही त्याच वेगाने गोलंदाजी करू शकतील असे खेळाडू आहेत, पण उमरानमध्ये एक विशेष प्रतिभा आहे. त्यामुळे मला आशा आहे की IPL प्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो आपला ठसा उमटवेल", असं बवुमा म्हणाला.
भारताचा टी२० संघ- लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार) दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
आफ्रिकेचा संघ- टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासें, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, मार्को येन्सन, तबरेझ सॅम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि वॅन डर डूसेन.
Web Title: IND vs SA T20 Series South African Captain in fear as Team India includes Jammu Express Fast Bowler Umran Malik
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.