सेंच्युरियन-
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघानं कसोटी मालिकेत दमदार सुरुवात केली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa Test Series) पहिल्या कसोटीत भारतीय संघानं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. भारतीय संघाचे बऱ्याच कालावधीनंतर मैदानावत उतरलेले वेगवान गोलंदाज चांगले फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे. जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली. पण सेंच्युरियन कसोटीत सर्वात लक्षवेधी कामगिरी केली ती भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा हुकमी एक्का असलेल्या मोहम्मद शमी (Mohammed Shami) यानं.
टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर ३१ वर्षीय मोहम्मद शमी याला ट्रोलिंग आणि टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आता शमीनं आपल्या जबरदस्त पुनरागमन करत टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात शमीनं द.आफ्रिकेच्या पाच खेळाडूंना माघारी धाडलं. यात शमीनं अॅडन मार्करम (१३), किगन पीटरसन (१५), टेम्बा बावुमा (५२), वियान मुलडर (१२) आणि कगिसो रबाडा (२५) यांच्या विकेट घेतल्या.
मोहम्मद शमीनं या जबरदस्त कामगिरीनंतर बीसीसीआय टिव्हीनं त्याच्याशी बातचित केली. यावेळी गोलंदाजी प्रशिक्षकक पारस महाम्ब्रे यांच्यासमोर शमीनं आपल्या मनातली गोष्ट देखील बोलून दाखवली. देशासाठी खेळल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो खूप काही देऊन जातो. यातून पुढील सामन्यांसाठीची प्रेरणा मिळते. यापुढेही अशीच चांगली कामगिरी करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिल, असं शमी म्हणाला.
शमीनं पहिल्या डावात पाच विकेट्स घेण्यासोबतच आणखी एक पराक्रमाला गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमध्ये शमीच्या २०० विकेट्स पूर्ण झाल्या आणि असं करणारा तो ११ वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर शमीला त्याच्या वडिलांची आठवण झाली. यावेळी शमी भावूक देखील झालेला पाहायला मिळाला. २०० वी विकेट प्राप्त केल्यानंतर मैदानात केलेले सेलिब्रेशन माझ्या वडिलांप्रती आदरांजली म्हणून केलं होतं, असं शमीनं सांगितलं.
Web Title: IND vs SA Test Match Mohammed Shami became emotional after his historic performance in Centurion Watch the video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.