Top 5 Indian Wicket Takers, IND vs SA T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीत रंगणार आहे. आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटी आणि वन डे सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्याचा वचपा काढण्याची संधी आता टीम इंडियाला आहे. या मालिकेसाठी फलंदाजांची कामगिरी महत्त्वाची असेलच. पण याशिवाय, भारतीय गोलंदाजी कशाप्रकारे गोलंदाजी करतात याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. याच निमित्ताने पाहूया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मध्ये सर्वाधिक बळी टिपणारे गोलंदाज कोण आहेत.
आफ्रिकन खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांचे कायमच वर्चस्व असते. तसेच, भारतात आफ्रिकेचा संघ येतो त्यावेळीही फलंदाजांचाच गोलंदाजांवर वरचष्मा राहतो. अशा परिस्थितीतही भारताच्या प्रतिभावान गोलंदाजांनी आफ्रिकेविरोधात चांगली कामगिरी केली आहे. आफ्रिकेविरूद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दोन गोलंदाज हे निवृत्त झालेले आहेत, तर तीन खेळाडू अजूनही टी२० क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. यादीत रविचंद्रन अश्विनचं नाव अव्वलस्थानी आहे. तर जहीर खान आणि आरपी सिंह या दोघांना टॉप-५ मध्ये समावेश आहे.
Top 5- दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सर्वाधिक टी२० विकेट्स घेणारे भारतीय
रविचंद्रन अश्विन- १०भुनवेश्वर कुमार- ८जहीर खान- ६हार्दिक पांड्या- ५आरपी सिंह- ५
भारताचा टी२० संघ- लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार) दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
आफ्रिकेचा संघ- टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासें, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, मार्को येन्सन, तबरेझ सॅम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि वॅन डर डूसेन.