सेंच्युरियन- भारताने दक्षिण आफ्रिकेचा अखेरच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात ८ गड्यांनी धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेवर ५-१ असा कब्जा केला. विराट कोहलीच्या (१२९*) नाबाद शतकी तडाख्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं. इतकंच नाही, तर सीरिजमध्ये तीन शतक आणि 2 अर्धशतक करून सगळ्यात जास्त रन्स केल्याने विराटला मॅन ऑफ द सीरिजचा किताबही देण्यात आला. या शानदार विजयानंतर विराट कोहलीने त्याच्या सुंपूर्ण विजयाचं श्रेय पत्नी अनुष्का शर्माला दिलं. 'दक्षिण आफ्रिका दौरा अनेक चढ-उतारांचा होता. लोकांनी यासाठी मैदानात तसंच मैदानाबाहेर साथ दिली. माझ्या जवळच्या लोकांना या विजयाचं श्रेय जातं. माझी पत्नी या संपूर्ण दौऱ्यादरम्यान माझा उत्साह वाढवत होती, यासाठी तिला मोठं श्रेय जातं.
कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे टीमवर तसंच कॅप्टन विराट कोहलीवर टीका झाली होती. यावेळीही अनुष्का माझ्याबरोबर खंबीरपणे उभे होती. माझ्यावर टीका होत असतानाच्या कठीण प्रसंगी अनुष्का माझा उत्साह वाढवत होती, असं विराटने सामान्यानंतर दिलेल्या प्रतिक्रितेय म्हंटलं. बॅटिंग चांगली करण्यासाठी तुम्ही एका चांगल्या झोनमध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या आजूबाजूला चांगली लोक असणं आवश्यक आहे, असंही विराट कोहली म्हणाला.
मालिका विजयानंतर विराट म्हणाला, आज मला खूप आनंद होतो आहे. गेल्या मॅचमध्ये माझा माइंडसेट ठीक नव्हता. आज मैदानात पूर्णवेळ मला छान वाटतं आहे. त्यामुळे आज मी समोरून येणाऱ्या बॉलवर योग्यपण लक्ष केंद्रीत केलं. जेव्हा तुच्या बॅटमधून रन्स निघतात, तुम्ही टीमला विजय मिळवून देऊन नॉटआऊट परत जाता तेव्हा खूप मस्त वाटतं. माझ्या क्रिकेट करिअरची अजून 8-9 वर्ष आहेत. त्यामुळे मला त्याचा पूरेपूर वापर करायचा आहे. माझ्याने जितकी होईल तितकी मेहनत करनी हे. दैवीकृपेने मी फिट आहे. देशासाठी कॅप्टन्सी करण्याची संधी मिळाली. ही गर्वाची गोष्ट आहे. याचा मी आदर करतो ज्यामुळे मला टीमला 120 टक्के काम देता येईल.