पर्थ : टी-२० विश्वचषकात भारताचा तिसरा सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे. भारतीय संघाने सुरूवातीचे दोन्हीही सामने जिंकून उपांत्यफेरीकडे कूच केली आहे. खरं तर भारतीय खेळाडू शानदार लयनुसार खेळत आहेत. मात्र सलामीवीर लोकेश राहुल याला अपवाद ठरला. राहुलने पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सविरूद्ध झालेल्या सामन्यात सर्वांनाच निराश केले. राहुलने पाकिस्तानविरूद्ध ८ चेंडूत ४ धावा केल्या होत्या तर नेदरलॅंड्सविरूद्धच्या सामन्यात १२ चेंडूत ९ धावा करून बाद झाला होता. नेदरलॅंड्सविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी केली होती.
दरम्यान, रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. भारतीय संघ ग्रुप बी मध्ये ४ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे, तर आफ्रिकेचा संघ ३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. उद्या होणारा सामना दोन्हीही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी मोठे विधान केले आहे. राहुलचा खराब फॉर्म पाहता त्याच्या जागी रिषभ पंतला संधी द्यावी या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. "आम्ही लोकेश राहुलच्या जागी रिषभ पंतला खेळवणार नाही, राहुल आगामी सामन्यात सलामीला खेळेल. ऋषभ पंत कठोर परिश्रम घेत आहे, तो अत्यंत प्रतिभावान आहे परंतु संघात केवळ ११ खेळाडू खेळू शकतात" अशा शब्दांत प्रशिक्षकांनी राहुलला वगळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न२७ ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, १२.३० वाजल्यापासून, सिडनी३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, ४.३० वाजल्यापासून, पर्थ२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, १.३० वाजल्यापासून, एडलेड६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"