या गोलंदाजांसमोर 'थंड' पडते रोहितची तळपती बॅट, आकडे बघून बसणार नाही तुमचा विश्वास!

या खेळीत रोहितने 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 06:38 PM2023-11-05T18:38:31+5:302023-11-05T18:40:10+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA world cup 2023 rohit sharma Record 12th Time out against kagiso rabada in international cricket | या गोलंदाजांसमोर 'थंड' पडते रोहितची तळपती बॅट, आकडे बघून बसणार नाही तुमचा विश्वास!

या गोलंदाजांसमोर 'थंड' पडते रोहितची तळपती बॅट, आकडे बघून बसणार नाही तुमचा विश्वास!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कर्णधार रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. पण 40 धावांवर असताना तो बाद झाला. या सामन्यात ज्या गोलंदाजाने त्याला बाद केले तो सध्या जगातील अव्वल गोलंदाजांमध्ये गणला जातो.

रोहितनं करून दिली जबरदस्त सुरुवात - 
या सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. आक्रमक फलंदाजी करत तो पहिल्याच षटकापासून आफ्रिकन गोलंदाजांवर तुटून पडला. मात्र जबरदस्त लयीत असतानाच 40 धावांवर कागिसो रबाडाच्या चेंडूवर टेंबा बावुमाकरवी तो झेलबाद झाला. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी झाली.

कागिसो रबाडा हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. रबाडाने रोहितला आतापर्यंत 12 वेळा बाद केले आहे. यानंतर टिम साउदीने रोहितला 11 वेळा तंबूत धाडले आहे. तर तिसरा क्रमांक श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजचा लागतो. त्याने रोहित शर्माला 10 वेळा बाद केले आहे.

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज -
कागिसो रबाडा - 12 वेळा
टिम साउथी - 11 वेळा
अँजेलो मॅथ्यूज - 10 वेळा
नाथन लायन - 9 वेळा
ट्रेंट बोल्ट - 8 वेळा
 

Web Title: IND vs SA world cup 2023 rohit sharma Record 12th Time out against kagiso rabada in international cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.