कर्णधार रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. पण 40 धावांवर असताना तो बाद झाला. या सामन्यात ज्या गोलंदाजाने त्याला बाद केले तो सध्या जगातील अव्वल गोलंदाजांमध्ये गणला जातो.
रोहितनं करून दिली जबरदस्त सुरुवात - या सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. आक्रमक फलंदाजी करत तो पहिल्याच षटकापासून आफ्रिकन गोलंदाजांवर तुटून पडला. मात्र जबरदस्त लयीत असतानाच 40 धावांवर कागिसो रबाडाच्या चेंडूवर टेंबा बावुमाकरवी तो झेलबाद झाला. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी झाली.
कागिसो रबाडा हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. रबाडाने रोहितला आतापर्यंत 12 वेळा बाद केले आहे. यानंतर टिम साउदीने रोहितला 11 वेळा तंबूत धाडले आहे. तर तिसरा क्रमांक श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजचा लागतो. त्याने रोहित शर्माला 10 वेळा बाद केले आहे.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज -कागिसो रबाडा - 12 वेळाटिम साउथी - 11 वेळाअँजेलो मॅथ्यूज - 10 वेळानाथन लायन - 9 वेळाट्रेंट बोल्ट - 8 वेळा