Join us  

विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् अनुष्का शर्माला झाला खूप आनंद, सोशल मीडियावर झाली व्यक्त

आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जोरदार शकत ठोकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 7:40 PM

Open in App

IND vs SL 1st ODI: आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जोरदार शकत ठोकले. श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत विराटने शतक ठोकले. विराटने या सामन्यात सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. विराटने ८७ चेंडूत १२ चौकार आणि १  षटकार ठोकत ११३ धावा केल्या. यानंतर विराटची बायको अनुष्का शर्माने (Anushka Sharma) इस्टाग्रामवर स्टोरी ठेवत विराटचे कौतुक केले आहे. 

विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) नेहमी काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. विराट कोहलीने वनडे मालिकेत श्रीलंकेविरुद्ध एक शानदार शतक झळकावून भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन केले आणि हे विराटचे 45 वे वनडे शतक होते. त्याने या शकताने एक नवा विक्रम केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा घरच्या मैदानावर 20 वनडे शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराटची पत्नी अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक लव इमोजीसह टीव्ही स्क्रीन शेअर केली आणि विराटला थेट मैदानातून दाखवणारा फोटो शेअर केला आहे,विराटने (Virat Kohli) 100 धावा केल्या म्हणून अनुष्काने ही स्टोरी शेअर केली आहे.  

नुकतेच, विराट आणि अनुष्का शर्मा सुट्टी घालवून परतले, या दोघांनी वृंदावनमध्ये आशीर्वाद देखील घेतले. आता, त्यांची मुलगी वामिकाच्या दुसर्‍या वाढदिवसापूर्वी, विराटने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते दोघेही समुद्रकिनार्‍यावर चालताना त्यांच्या मुलीचा हात दोन्ही बाजूंनी धरलेला दिसत आहे.

अनुष्का शर्मा तिच्या कमबॅक व्हेंचर चकडा एक्सप्रेसच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक 2023 मध्ये नेटफ्लिक्स या जाईंट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Virat Kohli Wasim Jaffer, IND vs SL 1st ODI: 'शेर के मुँह खून लग गया है, इस साल...'; विराटच्या शतकावर मुंबईकर क्रिकेटपटूचं भन्नाट ट्वीट

अनुष्का याअगोदर झिरोमध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफ सोबत दिसली होती. कॉमेडी-ड्रामा 2018 मध्ये थिएटरमध्ये आला, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. अनुष्का अलीकडेच तृप्ती दिमरी, बाबिल खान स्टारर काला या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसली होती.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा
Open in App