Join us  

IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीने खणखणीत शतक झळकावले, सचिन तेंडुलकरलाही इतक्या वेगाने हा विक्रम नाही जमला

India vs Sri Lanka, 1st ODI Live : शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सलामीनंतर विराट कोहलीने ( Virat Kohli Century) वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 4:57 PM

Open in App

India vs Sri Lanka, 1st ODI Live : शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सलामीनंतर विराट कोहलीने ( Virat Kohli Century) वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करताना विराटने सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये ४५ शतकांसाठी ४२४ इनिंग्ज खेळल्या, विराटने २५७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. 

 पळ हार्दिक पळ...! पांड्याने ऐकले नाही अन् विराट कोहली OUT होता होता वाचला, मग त्याचा चढला पारा

शुभमन आणि रोहित  शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. Umpire Call ने रोहित व शुभमन या दोघांनाही जीवदान दिले. २०व्या दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला. शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला अन् रोहितसोबत त्याची १४३ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. रोहितची फटकेबाजी सुरूच होती, परंतु २४व्या षटकात दिलशान मदूशंकाने ही वाटचाल रोखली.  रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. बॅटची किनार घेत चेंडू यष्टींवर आदळला. 

विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी धावांचा वेग कायम राखला होता, परंतु धनंजया डि सिल्वाने सापळा रचला. अय्यर २८ धावांवर झेलबाद झाला. विराटने वन डे क्रिकेटमधील ६५ वे अर्धशतक षटकार खेचून पूर्ण केले. श्रीलंकेच्या यष्टिरक्षकाने विराटचा सोपा झेल टाकला. त्यानंतर विराट सुसाट सुटला अन् लोकेश राहुलसह ७० चेंडूंत ९० धावा चोपल्या. लोकेश २९ चेंडूंत ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला. विराट काही श्रीलंकेच्या गोलंदाजांना बदणारा नव्हता, त्यात त्यांनी भारताच्या स्टार फलंदाजाला दोन जीवदान दिले. हार्दिक माज्ञ १४ धावा करून माघारी परतला. 

सर्वांना विराटच्या ७३व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा लागली होती आणि त्यामुळे त्याच्या प्रत्येक धावेवर स्टेडियमवर जल्लोष होताना दिसला. विराटने ८० चेंडूंत शतक पूर्ण केले. मायदेशातील हे त्याचे २०वे शतक ठरले अन् त्याने सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली. श्रीलंकेविरुद्ध विराटचे हे ९ वे शतक ठरले अन् त्याने सचिनच्या ( ९) विक्रमाशी बरोबरी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीसचिन तेंडुलकर
Open in App