IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीने केली वर्षाची दणक्यात सुरुवात; भारताची पहिल्या वन डेत श्रीलंकेवर मात

India vs Sri Lanka, 1st ODI Live : विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 09:24 PM2023-01-10T21:24:59+5:302023-01-10T21:25:15+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 1st ODI Live : India have defeated Sri Lanka by 67 runs in the first ODI, Hundred by Virat Kohli and Sri Lankan captain Dasun Shanaka | IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीने केली वर्षाची दणक्यात सुरुवात; भारताची पहिल्या वन डेत श्रीलंकेवर मात

IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीने केली वर्षाची दणक्यात सुरुवात; भारताची पहिल्या वन डेत श्रीलंकेवर मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 1st ODI Live : विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाज उम्रान मलिक, मोहम्मद सिराज यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना श्रीलंकेचा पराभव निश्चित केला. भारताने हा सामना ६७ धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने अखेरपर्यंत संघर्ष केला. उम्रानने ३ आणि सिराजने २ विकेट्स घेतल्या. 

OMG! मोहम्मद सिराजने कसला भारी चेंडू टाकला, श्रीलंकन फलंदाजाचा त्रिफळा उडवला, Video 

विराट कोहलीने ( Virat Kohli Century) आज वन डे क्रिकेटमधील ४५ वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. विराटने ८७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांसह ११३ धावा केल्या. विराटचे सोडलेले दोन झेल श्रीलंकेला महागात पडले. शुभमन आणि रोहित  शर्मा यांनी १४३ धावांची सलामी देताना टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला. रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी धावांचा वेग कायम राखला होता, परंतु धनंजया डि सिल्वाने सापळा रचला. अय्यर २८ धावांवर झेलबाद झाला. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये ४५ शतकांसाठी ४२४ इनिंग्ज खेळल्या, विराटने २५७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. भारताने ७ बाद ३७३ धावांचा डोंगर उभा केला. 
  
मोहम्मद सिराजने अविष्का फर्नांडो  व कुसल मेंडिसला बाद केले. सलामीवीर पथूम निसंका आणि चरिथ असलंका यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु उम्रान मलिकच्या वेगासमोर तेही नतमस्तक झाले. चरिथ २३ धावांवर उम्रानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. उम्रानने आजच्या सामन्यात 156kmph वेगाने चेंडू टाकला अन्  वन डे क्रिकेटमधील भारतीयाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. निसंका व धनंजया डी सिल्वा या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली. निसंकाने अर्धशतक झळकावताना ७२ धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीने अनुभव कामी आणताना धनंजयाला ( ४७) बाद केले. उम्रानच्या वेगवान गोलंदाजीवर फटका मारण्याचा निसंकाचा प्रयत्न फसला अन् अक्षर पटेलने सोपा झेल घेतला. निसंका ८० चेंडूंत ११ चौकारांसह ७२ धावांवर बाद झाला. 


वनिंदू हसरंगाने फिरकीपटू युझवेंद्र चहलला टार्गेट केले अन् ६ ,६,४ अशा धावा कुटल्या. पण, चहलने गुगली टाकून वनिंदूला आणखी एक उंच फटका मारण्यास भाग पाडले. श्रेयस अय्यर व उम्रान झेल टिपण्यासाठी समोरासमोर आले, परंतु अय्यरने चेंडूवर नजर कायम राखताना झेल टिपला. वनिंदू ७ चेंडूंत १६ धावा करून माघारी परतला. त्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला अन् भारताने विजय मिळवला. कर्णधार दासून शनाकाने संघर्ष दाखवताना शतक पूर्ण केले. परंतु श्रीलंकेला हार मानावी लागली. त्यांनी ८ बाद ३०६ धावांपर्यंत मजल मारली. शनाकाने ८८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०८ धावा केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs SL, 1st ODI Live : India have defeated Sri Lanka by 67 runs in the first ODI, Hundred by Virat Kohli and Sri Lankan captain Dasun Shanaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.