गुवाहटी : आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहटी येथे पार पडत आहे. मालिकेतील सलामीचा सामना बारसापारा स्टेडियमवर खेळवला जात असून या सामन्यासाठी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतून संघातील वरिष्ठ खेळाडू आगामी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघात पुनरागमन करत आहेत. कारण अलीकडेच पार पडलेल्या ट्वेंटी-20 मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली होती.
दरम्यान, मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी यजमान संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोठा झटका बसला. कारण बुमराह दुखातपीमुळे आगामी 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.
भारत विरूद्ध श्रीलंका वन डे मालिका
- 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
- 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
- 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"