SL vs IND ODI Live : ...म्हणून भारताच्या खेळाडूंनी बांधल्या काळ्या रंगाच्या फिती; जाणून घ्या कारण

SL vs IND 1st ODI Match Live : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात पहिला वन डे सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 02:54 PM2024-08-02T14:54:50+5:302024-08-02T15:01:57+5:30

whatsapp join usJoin us
ind vs sl 1st odi live Team India is wearing black armbands today in memory of former Indian cricketer and coach | SL vs IND ODI Live : ...म्हणून भारताच्या खेळाडूंनी बांधल्या काळ्या रंगाच्या फिती; जाणून घ्या कारण

SL vs IND ODI Live : ...म्हणून भारताच्या खेळाडूंनी बांधल्या काळ्या रंगाच्या फिती; जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SL vs IND 1st ODI Match Live Macth Updates In Marathi | कोलंबो : आज भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला वन डे सामना खेळवला जात आहे. सलामीच्या वन डे सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जात आहे. भारतीय संघात मोहम्मद सिराज तर श्रीलंकेच्या संघात मोहम्मद शिराजचा समावेश आहे. बुधवारी भारताचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले. 

बुधवारी निधन झालेले माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या स्मरणार्थ टीम इंडियाने आज हातावर काळ्या रंगाची फिती बांधून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पहिल्या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या कठीण प्रश्नावर व्यक्त होताना रोहितनेही भाष्य करणे टाळले होते. मात्र, आज अखेर उत्तर मिळाले असून लोकेश राहुलला संधी देण्यात आली आहे, तर रिषभ पंत बाकावर असेल. नाणेफेकीवेळी रोहित मिश्किलपणे म्हणाला की, मी प्रामुख्याने माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करेन. कारण गोलंदाजी करण्यासाठी आमच्या संघात इतर गोलंदाज आहेतच. 

ट्वेंटी-२० मालिका ३-० ने खिशात घातल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज आहे. या मालिकेतून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन झाले आहे. कोलंबो येथे शेवटच्या वेळी भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेशी भिडला होता. २०२३ मध्ये झालेल्या या सामन्यात मोहम्मद सिराजचे वादळ पाहायला मिळाले होते. त्याने घातक गोलंदाजी केल्याने यजमान संघ अवघ्या ५० धावांत गारद झाला होता. मागील दहा वर्षांपासून श्रीलंकेची भारताविरूद्धची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली असून, २४ पैकी केवळ ३ सामने जिंकण्यात श्रीलंकेला यश आले आहे.  

भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेचा संघ -
चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, जनिथ लियांगे, वानिंदू हसरंगा, अकिला धनंजया, असिथो फर्नांडो, डुनिथ वेलालेज, मोहम्मद शिराज.

Web Title: ind vs sl 1st odi live Team India is wearing black armbands today in memory of former Indian cricketer and coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.