Join us  

IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडून जगात अव्वल!

India vs Sri Lanka, 1st ODI Live : शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीनेही अर्धशतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 4:17 PM

Open in App

India vs Sri Lanka, 1st ODI Live : शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीनेही अर्धशतक पूर्ण केले. शुभमन व रोहितने पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर  श्रेयस अय्यरला मोठी खेळी करता आली नाही. अशा परिस्थितीत विराटने मोर्चा सांभाळला अन् वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला

IND vs SL, 1st ODI Live : रोहित शर्माचे शतक हुकले; हिटमॅनच्या खेळीने विश्वविक्रम नोंदवले, अनेक रेकॉर्ड मोडले

शुभमन आणि रोहित  शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. रोहितने वन डे क्रिकेटमधील ४७ वे अर्धशतक पूर्ण करताना चांगली फटकेबाजी केली. शुभमन गिलने त्याची निवड का केली गेली, हे खेळातूनच दाखवून दिले. ४५ धावांवर असताना वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर रोहित पायचीत होता, परंतु मैदानावरील  अम्पायरने नाबाद दिल्याने तिसऱ्या अम्पायरनेही Umpire Call दिला अन् भारतीय कर्णधाराला जीवदान मिळाले. १७व्या षटकात शुभमनलाही Umpire Call ने वाचवले. त्यानंतर त्यानेही वन डेतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी आक्रमक खेळ सुरू ठेवताना १९व्या षटकात १९ धावा चोपल्या. शुभमनने सलग तीन चौकार खेचले, तर रोहितने खणखणीत षटकार मारला. पुढील षटकार दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला. शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला अन् रोहितसोबत त्याची १४३ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. 

रोहितची फटकेबाजी सुरूच होती, परंतु २४व्या षटकात दिलशान मदूशंकाने ही वाटचाल रोखली.  रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. बॅटची किनार घेत चेंडू यष्टींवर आदळला. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी धावांचा वेग कायम राखला होता, परंतु धनंजया डि सिल्वाने सापळा रचला. अय्यर २८ धावांवर झेलबाद झाला. विराटने वन डे क्रिकेटमधील ६५ वे अर्धशतक षटकार खेचून पूर्ण केले. श्रीलंकेच्या यष्टिरक्षकाने विराटचा सोपा झेल टाकला.

विराटने वन डे क्रिकेटच्या इतिहासात  सर्वात वेगाने १२५००+ धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. त्याने २५७ इनिंग्ज ( डाव) मध्ये हा टप्पा ओलांडलाना महान फलंदाज सचिन  तेंडुलकरचा ( ३१० डाव) विक्रम मोडला. त्यानंतर रिकी पाँटिंग ( ३२८), कुमार संगकारा ( ३४५ ), सनथ जयसूर्या ( ४०२) आणि माहेला जयवर्धने ( ४११) यांचा विक्रम मोडला. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीसचिन तेंडुलकररोहित शर्माशुभमन गिल
Open in App