India vs Sri Lanka, 1st ODI Surya Interviews Virat Kohli : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL ) मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू खेळणारे सुर्यकुमार यादव व विराट कोहली यांची ठस्सन सर्वांना आजही लक्षात आहे. पण, आयपीएलमधील या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये आता घट्ट मैत्री झाली आहे. भारत-श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यानंतर सूर्यकुमारने विराटची शानदार मुलाखत घेतली आणि BCCI ने पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. विराटने पहिल्या वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे ७३वे शतक ठरले. या सामन्यात सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नव्हती. पण, मॅचनंतर दोघांच्या व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली.
सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम, ICC कडून विशेष कौतुक
- मुलाखतीत सूर्याने विराटला विचारले की, तू दमदार कमबॅक कसे केलेस?
- विराट म्हणाला, अपयशाचे स्वीकार करून... सातत्याने अपयश येत असल्याने मी प्रचंड वैतागलो होतो, प्रत्येक क्षण भितीदायक वाटत होता. अनुष्का किंवा जवळच्या अन्य लोकांवर माझ्या वागण्याने अन्याय होत होता. अपयश स्वीकारायला हवे हे मला कळले आणि मी दोन पावलं मागं गेलो. आशिया कपपूर्वी विश्रांती घेत स्वत:ला ताजेतवाने केले आणि सर्व काही बदलले.
- विराटनेही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सूर्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
- तो म्हणाला, “तू वेगळ्या स्तरावर खेळत आहेस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तू एक नवीन टेम्पलेट तयार केले आहेस. लोक तुझ्यावर प्रेम करत आहेत, तुला खूप आपुलकी मिळत आहे. हे असेच चालू राहील अशी आशा आहे. तू जे करत आहेस ते आश्चर्यकारक आहे.”
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"