Ravindra Jadeja, Pushpa Style Celebration, IND vs SL : सलामीवीर इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांची दमदार शतकी सलामी आणि श्रेयस अय्यरची फटकेबाजी याच्या जोरावर भारताने २० षटकात १९९ धावांपर्यंत मजल मारली. इशान किशनच्या ८९, अय्यरच्या नाबाद ५७ आणि रोहितच्या ४४ धावांमुळे भारताने श्रीलंकेला २०० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांची अवस्था फारच वाईट झाली. श्रीलंकेचे पहिले चार फलंदाज केवळ ५१ धावांमध्ये माघारी परतले. त्यातही चौथ्या विकेटनंतर जाडेजाने केलेलं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन विशेष चर्चेत आलं.
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या तीन विकेट्स झटपट घेतल्या. शून्यावर पहिली, १५ धावांवर दुसरी तर ३६ धावांवर श्रीलंकेने तिसरी विकेट गमावली. त्यानंतर श्रीलंकन फलंदाजांनी संघाला कशीबशी अर्धशतकी मजल मारून दिली. पण त्यानंतर लगेचच जाडेजाने अनुभवी दिनेश चंडीमलला बाद केले. ९ चेंडूत एका षटकारासह १० धावांची दमदार सुरूवात करणाऱ्या चंडीमलला इशान किशनने स्टंपिंग करत बाद केलं. पण इशानच्या स्टंपिंगपेक्षाही रविंद्र जाडेजाच्या पुष्पा स्टाईल सेलिब्रेशनचीच जास्त चर्चा दिसून आली. पाहा व्हिडीओ-
--
दरम्यान, त्याआधी भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा पहिला गडी बाद केला. त्यानंतर मिशाराचा ११ धावांवर झेल सुटला. पण पुढच्याच चेंडूवर रोहित शर्माने त्याचा उत्तम झेल टिपत त्याला माघारी धाडलं. पाठोपाठ जनीत लियांगेही ११ धावांवर बाद झाला. पहिल्या डावापासून सुरू झालेली पडझड श्रीलंकेला शेवटपर्यंत रोखताच आली नाही.