Rohit Sharma Catch, IND vs SL : भारतीय सलामीवीर इशान किशन (८९), कर्णधार रोहित शर्मा (४४) आणि श्रेयस अय्यर (नाबाद ५७) यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने २० षटकात १९९ धावा कुटल्या. पण या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांची मात्र दमछाक झाली. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने सुरुवातीच्या काही षटकातच संघाला दोन बळी मिळवून दिले. त्यातील दुसऱ्या विकेटची जास्त चर्चा पाहायला मिळाली.
भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेच्या सलामीवीराचा त्रिफळा उडवला. चेंडू रोखायला जाणारा फलंदाज काहीही न कळल्यामुले त्रिफळाचीत झाला आणि शून्यावरच माघारी परतला. त्यानंतर डावाच्या तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर भुवीने मिशाराला चेंडू टाकला. त्याने चेंडू हवेत मारला पण वेंकटेश अय्यरने त्याचा झेल सोडला. त्यावेळी त्याने दोन धावा घेतल्या. त्याला मिळालेल्या जीवदानानंतर तो आणखी किती धावा करणार असा प्रश्न साऱ्यांपुढेच होता. पण रोहित शर्माने आपली स्मार्ट गोलंदाजी दाखवून दिली. भुवीला त्याने पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू टाकायला लावलं आणि स्वत:च तो झेल टिपत फलंदाजाचा बदला घेतला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, त्याआधी रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी १११ धावांची शतकी सलामी दिली. त्यामुळे भारतीय संघ द्विशतकी मजल मारेल अशी अपेक्षा होती. श्रेयस अय्यरने तुफानी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. पण द्विशतकाला केवळ एक धावा कमी पडली.