IND vs SL, 1st T20I Live Update : भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर घेतली 'विचित्र' विकेट; श्रीलंकेच्या फलंदाजाला पाहून हसला, Video 

भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला धक्का दिला आणि तिसऱ्या चेंडूवर आणखी एक विकेट घेताना दुसरा धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 09:24 PM2022-02-24T21:24:46+5:302022-02-24T21:45:03+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 1st T20I Live Update : Bhuvneshwar Kumar strikes in the first ball, gets Nissanka for a golden duck, Watch Video  | IND vs SL, 1st T20I Live Update : भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर घेतली 'विचित्र' विकेट; श्रीलंकेच्या फलंदाजाला पाहून हसला, Video 

IND vs SL, 1st T20I Live Update : भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर घेतली 'विचित्र' विकेट; श्रीलंकेच्या फलंदाजाला पाहून हसला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन ( Ishan Kishan), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला धक्का दिला आणि तिसऱ्या चेंडूवर आणखी एक विकेट घेताना दुसरा धक्का दिला. पण, पहिल्याच चेंडूवर मिळालेल्या विकेटवर काही क्षणासाठी भुवीलाही विश्वास बसत नव्हता. जेव्हा त्याला विकेट मिळाल्याचे समजले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील  हसू थांबले नाही. 

इशान किशन आणि रोहित यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. इशान किशन आज तुफान फॉर्मात होता. तो श्रीलंकेच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला. ७व्या षटकात जेफरी वंदेर्सायच्या गोलंदाजीवर इशानचा फटका चूकला अन् चेंडू हवेत उडाला, परंतु लियानागे हे झेल टिपण्यात चूक केली. इशानला ४३ धावांवर जीवदान मिळाले.  इशानने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याआधी रोहित शर्माने ३८ धावा करून मोठा विक्रम मोडला. १२ व्या षटकात लाहिरू कुमाराने ही भागीदारी तोडली. त्याने रोहित शर्माला ४४ धावांवर त्रिफळाचीत केले. इशान व रोहितने पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या.  श्रेयस अय्यर अधिक स्ट्राईक इशानलाच देण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि इशानही चौफेर फटकेबाजी करून फलंदाजीचा आस्वाद लुटत होता. 

१७व्या षटकात इशान बाद झाला. त्याने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८९ धावा कुटल्या. त्यानंतर श्रेयसने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला २ बाद १९९ धावांचा पल्ला गाठून दिला. श्रेयस २८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात भुवीने पहिल्याच चेंडूवर पथूम निसंकाची विकेट घेतली. भुवीने टाकलेला चेंडू पथूमने बॅटने अडवला, परंतु तो सरपटत यष्टींवर जाऊन आदळला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा भुवी पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. ( Bhuvneshwar Kumar becomes the FIRST Indian bowler to take a wicket on the first ball of a men's T20I innings.)त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने कामिल मिशारा ( १३) याची विकेट घेतली. श्रीलंकेच्या ६ षटकांत २ बाद ३६ धावा झाल्या आहेत.

Web Title: IND vs SL, 1st T20I Live Update : Bhuvneshwar Kumar strikes in the first ball, gets Nissanka for a golden duck, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.