IND vs SL, 1st T20I Live Update : रोहित शर्माने आणखी एकाला दिली पदार्पणाची संधी, Krunal Pandyaची 'कोंडी'; टीम इंडियात सहा बदल

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आजपासून श्रीलंकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 06:35 PM2022-02-24T18:35:11+5:302022-02-24T18:40:54+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 1st T20I Live Update : Deepak Hooda making his T20 debut, Sri Lanka have won the toss and will bowl first, playing XI | IND vs SL, 1st T20I Live Update : रोहित शर्माने आणखी एकाला दिली पदार्पणाची संधी, Krunal Pandyaची 'कोंडी'; टीम इंडियात सहा बदल

IND vs SL, 1st T20I Live Update : रोहित शर्माने आणखी एकाला दिली पदार्पणाची संधी, Krunal Pandyaची 'कोंडी'; टीम इंडियात सहा बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आजपासून श्रीलंकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिला ट्वेंटी-२० सामना लखनौमध्ये होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघ धर्मशाला येथे रवाना होईल. श्रीलंकेने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन आजच्या सामन्यात एका अष्टपैलू खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे आणि हा कृणाल पांड्यासाठी धोक्याचा इशारा आहे. 


माजी कर्णधार विराट कोहली व रिषभ पंत यांना विश्रांती घेतली आहे आणि ते कसोटी मालिकेत भारतीय संघात परततील. पण, पहिल्या ट्वेंटी-२० लढतीपूर्वी भारताला दोन धक्के बसले. सूर्यकुमार यादव व दीपक चहर हे दोघांनी दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार हा मालिकावीर ठरला होता. पण, जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला मजबूती मिळाली आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांच्या Playing XI बाबत सर्वांना उत्सुकता होती.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून वन डे संघात पदार्पण करणाऱ्या दीपक हुडाने ( Deepak Hooda) आज ट्वेंटी-२० संघातही पदार्पण केले. हुडाने दोन वन डे सामन्यांत ५५च्या सरासरीने ५५ धावा केल्या आणि १ विकेटही घेतली आहे.  स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २९०८ धावा व २० विकेट्स, लिस्ट ए क्रिकेटमध्ये २३१३ धावा व ३६ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त २१७२ धावा व १७ विकेट्स आहेत. वेंकटेशच्या या यशामुळे कृणाल पांड्याचे ( Krunal Pandya) पुनरागमन संकटात आले आहे. बडोदा संघाकडून एकत्र खेळणाऱ्या या खेळाडूंमध्ये विकोपाचा वाद झाला होता. कृणाला जुलै २०२१मध्ये भारताकडून अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता.

भारतीय संघात आज सहा बदल पाहायला मिळाले. संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व युझवेंद्र चहल यांचे पुनरागमन झाले, तर दीपक हुडाचे पदार्पण झाले.

भारतीय संघ - रोहित शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल
 

Web Title: IND vs SL, 1st T20I Live Update : Deepak Hooda making his T20 debut, Sri Lanka have won the toss and will bowl first, playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.