India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आजपासून श्रीलंकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिला ट्वेंटी-२० सामना लखनौमध्ये होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघ धर्मशाला येथे रवाना होईल. श्रीलंकेने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन आजच्या सामन्यात एका अष्टपैलू खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे आणि हा कृणाल पांड्यासाठी धोक्याचा इशारा आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून वन डे संघात पदार्पण करणाऱ्या दीपक हुडाने ( Deepak Hooda) आज ट्वेंटी-२० संघातही पदार्पण केले. हुडाने दोन वन डे सामन्यांत ५५च्या सरासरीने ५५ धावा केल्या आणि १ विकेटही घेतली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २९०८ धावा व २० विकेट्स, लिस्ट ए क्रिकेटमध्ये २३१३ धावा व ३६ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त २१७२ धावा व १७ विकेट्स आहेत. वेंकटेशच्या या यशामुळे कृणाल पांड्याचे ( Krunal Pandya) पुनरागमन संकटात आले आहे. बडोदा संघाकडून एकत्र खेळणाऱ्या या खेळाडूंमध्ये विकोपाचा वाद झाला होता. कृणाला जुलै २०२१मध्ये भारताकडून अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता.
भारतीय संघात आज सहा बदल पाहायला मिळाले. संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व युझवेंद्र चहल यांचे पुनरागमन झाले, तर दीपक हुडाचे पदार्पण झाले.