India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आजपासून श्रीलंकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिला ट्वेंटी-२० सामना लखनौमध्ये होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघ धर्मशाला येथे रवाना होईल. शनिवार व रविवार असे लागोपाठ हे सामने होतील.
माजी कर्णधार विराट कोहली व रिषभ पंत यांना विश्रांती घेतली आहे आणि ते कसोटी मालिकेत भारतीय संघात परततील. पण, पहिल्या ट्वेंटी-२० लढतीपूर्वी भारताला दोन धक्के बसले. सूर्यकुमार यादव व दीपक चहर हे दोघांनी दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार हा मालिकावीर ठरला होता. पण, जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला मजबूती मिळाली आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
- भारत - श्रीलंका पहिला सामना किती वाजता सुरू होणार?भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होईल, ६.३० वाजता नाणेफेक होईल
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी आणि डिस्ने+हॉटस्टार
- श्रीलंकेचा ट्वेंटी-२० संघ - दासून शनाका, चरिथ असालांका, पथुम निसांका, कुशल मेंडिस, दिनेश चंडीमल, धनुष्का गुणातिलका, कामिल मिशारा, जनथ लियानागे, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दुश्मंथा चमीरा, बिनुरा फर्नाण्डो, शिरन फर्नाण्डो, महीश तिक्ष्णा, जॅफरी वेंडरसे, प्रवीन जयाविक्रमा, आशियान डेनियल.
- भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान
- भारत-श्रीलंका सुधारित वेळापत्रकपहिली ट्वेंटी-२० - २४ फेब्रुवारी, लखनौदुसरी ट्वेंटी-२० - २६ फेब्रुवारी, धर्मशालातिसरी ट्वेंटी-२० - २७ फेब्रुवारी, धर्मशालापहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहालीदुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट), बंगळुरू