IND vs SL 1st T20I Live Updates : इशान किशनने कसला अविश्वसनीय कॅच घेतला; वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावाचा जय जयकार झाला, Video 

भारताच्या गोलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले आहे. त्यात इशान किशनने घेतला अविश्वसनीय कॅच सर्वांचे मन जिंकणारा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:46 PM2023-01-03T21:46:01+5:302023-01-03T21:46:16+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL 1st T20I Live Updates : Brilliant catch by Ishan Kishan & fantastic bowling by Umran Malik, send back Charith Asalanka, Video  | IND vs SL 1st T20I Live Updates : इशान किशनने कसला अविश्वसनीय कॅच घेतला; वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावाचा जय जयकार झाला, Video 

IND vs SL 1st T20I Live Updates : इशान किशनने कसला अविश्वसनीय कॅच घेतला; वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावाचा जय जयकार झाला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वानखेडे स्टेडियमवर उत्तम गोलंदाजी करताना भारताच्या धावांवर चाप लावला होता. इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी चांगला खेळ करताना ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. दीपक हुडाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अक्षर पटेलनेही हुडाला दमदार साथ दिली. भारताच्या गोलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले आहे. त्यात इशान किशनने घेतला अविश्वसनीय कॅच सर्वांचे मन जिंकणारा ठरला. 

श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इशान किशनने पहिल्याच षटकात १७ धावा चोपल्या. पदार्पणवीर गिलने दुसऱ्या षटकात चौकाराने खाते उघडले. पण, गिल ( ७) व सूर्यकुमार यादव ( ७) हे झटपट माघारी परतले. संजू सॅमसनही ५ धावांवर माघारी परतला. इशानची फटकेबाजी सुरूच  होती आणि कर्णधार हार्दिक पांड्यासह त्याने ३१ धावांची भागीदारीही केली. पण, वनिंदू हसरंगाने त्याला फिरकीच्या जाळ्यात ओढले अन् इशानला ३७ धावांवर ( ३ चौकार व २ षटकार) माघारी जावे लागले. 


हार्दिकवरच आता पूर्ण मदार होती, परंतु श्रीलंकेच्या गोलंदाजांनी धावांवर लगाम लावली होती. दडपणाखाली असलेल्या हार्दिकची १५व्या षटकात विकेट मिळाली. दिलशान मधुशंकाच्या चेंडूवर कट मारण्याचा हार्दिकचा प्रयत्न फसला अन् २९ धावांवर यष्टीरक्षकाच्या हाती तो झेल देऊन माघारी परतला. १६व्या षटकात दीपक हुडाने गिअर बदलला अन् थिक्सानाला सलग दोन षटकार खेचून चाहत्यांमध्ये ऊर्जा फुंकली. दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अखेरच्या पाच षटकांत फटकेबाजी केली. अक्षरने २० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या, तर दीपकने २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या. या दोघांनी ३५ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली आणि भारताने ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. 

हार्दिकने पहिले षटक टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले. पदार्पणवीर शिवम मावीने दुसऱ्या षटकात पथुम निसंकाला ( १) बाद करून श्रीलंकेला पहिला धक्का दिला.  मावी आज थांबणारा नव्हता आणि त्याने चौथ्या षटकात धनंजया सिल्वाला ( ८) बाद केले. चमिका असलंका व कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उम्रान मलिकच्या वेगवान चेंडूवर पुल मारण्याचा चमिकाचा ( १२) प्रयत्न फसला अन् यष्टीरक्षक इशान किशनने फाईन लेग बाऊंड्रीच्या दिशेने धाव घेत अप्रतिम झेल टिपला. पुढच्याच षटकात हर्षल पटेलने श्रीलंकेला मोठा धक्का दिला अन् कुसल ( २८) धावांवर संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. 

Web Title: IND vs SL 1st T20I Live Updates : Brilliant catch by Ishan Kishan & fantastic bowling by Umran Malik, send back Charith Asalanka, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.