Join us  

IND vs SL 1st T20I Live Updates : OMG! भारताला मोठा झटका, हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे सोडले मैदान, जाणून घ्या अपडेट्स

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : दीपक हुडा व अक्षर पटेल यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 10:07 PM

Open in App

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : दीपक हुडा व अक्षर पटेल यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पदार्पणवीर शिवम मावीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत श्रीलंकेला दोन धक्के दिले. त्यानंतर हर्षल पटेलने दोन व उम्रान मलिकने एक विकेट घेत पाहुण्यांना बॅकफूटवर टाकले. पण, भारतालाही मोठा धक्का बसला आहे, कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) दुखापतीमुळे मैदान सोडले. सूर्यकुमार यादव नेतृत्व  करत आहे.

इशान किशनने कसला अविश्वसनीय कॅच घेतला; वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावाचा जय जयकार झाला, Video 

 श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरीही करून दाखवली. पदार्पणवीर शुभमन गिल ( ७), सूर्यकुमार यादव ( ७)  व संजू सॅमसन ( ५) हे माघारी परतले. इशान किशनने  कर्णधार हार्दिक पांड्यासह त्याने ३१ धावांची भागीदारी केली. पण, तो ३७ धावांवर ( ३ चौकार व २ षटकार) माघारी जावे लागले. हार्दिक २९ धावांवर यष्टीरक्षकाच्या हाती तो झेल देऊन माघारी परतला. १६व्या षटकात दीपक हुडाने गिअर बदलला अन् थिक्सानाला सलग दोन षटकार खेचून चाहत्यांमध्ये ऊर्जा फुंकली. दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अखेरच्या पाच षटकांत फटकेबाजी केली. अक्षरने २० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या, तर दीपकने २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या. या दोघांनी ३५ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली आणि भारताने ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली.  हार्दिकने पहिले षटक टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले. पदार्पणवीर शिवम मावीने दुसऱ्या षटकात पथुम निसंकाला ( १) बाद करून श्रीलंकेला पहिला धक्का दिला.  मावी आज थांबणारा नव्हता आणि त्याने चौथ्या षटकात धनंजया सिल्वाला ( ८) बाद केले. चमिका असलंका व कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उम्रान मलिकच्या वेगवान चेंडूवर पुल मारण्याचा चमिकाचा ( १२) प्रयत्न फसला अन् यष्टीरक्षक इशान किशनने फाईन लेग बाऊंड्रीच्या दिशेने धाव घेत अप्रतिम झेल टिपला. पुढच्याच षटकात हर्षल पटेलने श्रीलंकेला मोठा धक्का दिला अन् कुसल ( २८) धावांवर संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

पटेलच्या षटकात भानुका राजपक्षाचा ( १०) झेल हार्दिकने टिपला, परंतु त्याच्या पाय मुरगळला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. सूर्यकुमार यादव नेतृत्व करताना दिसला. १५व्या षटकात हार्दिक पुन्हा मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी आला. शिवम मावीच्या गोलंदाजीवर हार्दिकने श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाचा ( २१) झेलही  टिपला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादव
Open in App