IND vs SL 1st T20I Live Updates : इशान, हार्दिक, दीपक, अक्षर यांनी इभ्रत वाचवली; श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेली कोंडी

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. अखेरच्या पाच षटकांत या दोघांच्या फटकेबाजीने  मैदान गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:42 PM2023-01-03T20:42:35+5:302023-01-03T20:43:00+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL 1st T20I Live Updates : India finishes at 162/5 - a marvelous partnership between Deepak Hooda and Axar Patel. Hooda smashed 41* (23), Axar scored 31* (20). | IND vs SL 1st T20I Live Updates : इशान, हार्दिक, दीपक, अक्षर यांनी इभ्रत वाचवली; श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेली कोंडी

IND vs SL 1st T20I Live Updates : इशान, हार्दिक, दीपक, अक्षर यांनी इभ्रत वाचवली; श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेली कोंडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वानखेडे स्टेडियमवर उत्तम गोलंदाजी करताना भारताच्या धावांवर चाप लावला होता. इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी चांगला खेळ करताना ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. दीपक हुडाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अक्षर पटेलनेही हुडाला दमदार साथ दिली. 

श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात आज शुभमन गिल व शिवम मावी या दोन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे.  भारतीय संघाकडून गोलंदाजीची सुरूवात अर्शदीप सिंग करण्याची शक्यता होती. पण, तो आजारपणातून बरा झाला नसल्याने पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे हार्दिकने स्पष्ट केले. त्यामुळे मावीला संधी मिळाली. बांगलादेश दौऱ्यावर द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनने पहिल्याच षटकात १७ धावा चोपल्या. पदार्पणवीर गिलने दुसऱ्या षटकात चौकाराने खाते उघडले. तिसऱ्या षटकात महीष थिक्सानाला गोलंदाजीला आणले आणि त्याने गिलला ७ धावांवर LBW केले. चमिका करुणारत्नेने सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवला ( ७) माघारी पाठवले. स्कूप मारण्याचा सूर्याचा प्रयत्न फसला अन् वानखेडेवर सन्नाटा पसरला. भारताला पॉवर प्लेमध्ये २ बाद ४१ धावा करता आल्या. 

संजू सॅमसनही ५ धावांवर माघारी परतला अन् भारताने ४६ धावांवर तिसरा फलंदाज गमावला.  इशानची फटकेबाजी सुरूच  होती आणि कर्णधार हार्दिक पांड्यासह त्याने ३१ धावांची भागीदारीही केली. पण, वनिंदू हसरंगाने त्याला फिरकीच्या जाळ्यात ओढले अन् इशानला ३७ धावांवर ( ३ चौकार व २ षटकार) माघारी जावे लागले. हार्दिकवरच आता पूर्ण मदार होती, परंतु श्रीलंकेच्या गोलंदाजांनी धावांवर लगाम लावली होती. दडपणाखाली असलेल्या हार्दिकची १५व्या षटकात विकेट मिळाली. दिलशान मधुशंकाच्या चेंडूवर कट मारण्याचा हार्दिकचा प्रयत्न फसला अन् २९ धावांवर यष्टीरक्षकाच्या हाती तो झेल देऊन माघारी परतला. १६व्या षटकात दीपक हुडाने गिअर बदलला अन् थिक्सानाला सलग दोन षटकार खेचून चाहत्यांमध्ये ऊर्जा फुंकली. थिक्सानाने ४ षटकांत २९ धावा देत १ विकेट घेतली. चौथ्या  षटकात १७ धावा आल्या.

दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. अखेरच्या पाच षटकांत या दोघांच्या फटकेबाजीने  मैदान गाजवले. अक्षरने २० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या, तर दीपकने २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या. या दोघांनी ३५ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली आणि भारताने ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. 

Web Title: IND vs SL 1st T20I Live Updates : India finishes at 162/5 - a marvelous partnership between Deepak Hooda and Axar Patel. Hooda smashed 41* (23), Axar scored 31* (20).

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.