India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. BCCI ने २०२४चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन हार्दिककडे नेतृत्व सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात आज शुभमन गिल व शिवम मावी या दोन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजीची सुरूवात अर्शदीप सिंग करण्याची शक्यता होती. पण, तो आजारपणातून बरा झाला नसल्याने पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे हार्दिकने स्पष्ट केले. त्यामुळे मावीला संधी मिळाली.
बांगलादेश दौऱ्यावर द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनने पहिल्याच षटकात १७ धावा चोपल्या. पदार्पणवीर गिलने दुसऱ्या षटकात चौकाराने खाते उघडले. तिसऱ्या षटकात महीष थिक्सानाला गोलंदाजीला आणले आणि त्याने गिलला ७ धावांवर LBW केले. चमिका करुणारत्नेने सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवला ( ७) माघारी पाठवले. स्कूप मारण्याचा सूर्याचा प्रयत्न फसला अन् वानखेडेवर सन्नाटा पसरला. भारताला पॉवर प्लेमध्ये २ बाद ४१ धावा करता आल्या. संजू सॅमसनही ५ धावांवर माघारी परतला अन् भारताने ४६ धावांवर तिसरा फलंदाज गमावला.