IND vs SL 1st T20I Live Updates : २०१८च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील दोन खेळाडूंचे पदार्पण; श्रीलंकेने जिंकला टॉस अन्...

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:33 PM2023-01-03T18:33:16+5:302023-01-03T18:35:26+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL 1st T20I Live Updates : Shivam Mavi 100th India T20I player and Shubman Gill 101st India T20I player - famous 2018 U-19 batch, Sri Lanka won the toss and decided to bowl first. | IND vs SL 1st T20I Live Updates : २०१८च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील दोन खेळाडूंचे पदार्पण; श्रीलंकेने जिंकला टॉस अन्...

IND vs SL 1st T20I Live Updates : २०१८च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील दोन खेळाडूंचे पदार्पण; श्रीलंकेने जिंकला टॉस अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. BCCI ने २०२४चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन  हार्दिककडे नेतृत्व सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात वरिष्ठ खेळाडूंना ट्वेंटी-२० संघातून बाहेर बसवून युवा खेळाडूंना संधी देण्याचा संघ व्यवस्थापनेचा प्रयत्न आहे. त्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे आणि त्यामुळेच आशियाई विजेत्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 

भारताच्या ट्वेंटी-२० स्क्वाडमध्ये अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. २०२४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेकडे पाहता त्यांची निवड करण्यात आलीये. शुभमन गिलही यापैकी एक आहे. तो १३ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळला आहे. परंतु ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्यानं पदार्पण केलेलं नाही. त्यामुळे गिलला आजच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आहे.  मीडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा फलंदाजी करू शकतात. शिवम मावी याचेही आज पदार्पण होत आहे.

२०१८ साली झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील शिवम मावी व शुभमन गिल हे अनुक्रमे वरिष्ठ संघात ट्वेंटी-२० त पदार्पण करणारे १०० व १०१ वे खेळाडू ठरले. 

  • २०२१ पासून भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यांत जय-पराजयाची आकडेवारी ४-३ अशी भारताच्या बाजूने आहे
  • युझवेंद्र चहलने आज चार विकेट्स घेताच तो भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल अन् भुवनेश्वर कुमारचा ९० विकेट्सचा विक्रम मोडेल.

 

भारतीय संघ - हार्दिक पांड्या, इशान किशन, शुभमन गिल, सूर्याकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उम्रान मलिक, युझवेंद्र चहल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs SL 1st T20I Live Updates : Shivam Mavi 100th India T20I player and Shubman Gill 101st India T20I player - famous 2018 U-19 batch, Sri Lanka won the toss and decided to bowl first.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.