Join us  

IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : रवींद्र जडेजाच्या फटकेबाजीने श्रीलंकन गोंधळले, विकेट घेण्याची आयती संधी गमावून बसले, Video 

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित करून श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 3:15 PM

Open in App

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित करून श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याने नाबाद १७५ धावांची खेळी साकारली. रिषभ पंतचे शतक हुकल्याने निराश झालेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर जडेजाने हास्य फुलवले. जडेजाने आर अश्विन व मोहम्मद शमी यांच्यासह ८ व्या व ९व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय संघ मैदानावर उतरला. जडेजाची फटकेबाजी पाहून श्रीलंकेचे खेळाडू एवढे सैरभैर झाले की ते आयती विकेटही घेऊ शकले नाही. 

पहिल्या दिवसाचा खेळ रिषभ पंतने गाजवला. त्याच्या ९६ धावांची भारताला मजबूत स्थितीत आणले. मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) यांचेही योगदान होतेच. दुसऱ्या दिवसाचा खेळ जडेजाच्या नावावर राहिला. त्याने  आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर  ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.  

मोहालीतील कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी भारताने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ५१६ धावा केल्या होत्या. त्याआधी १९९७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९ बाद ५१५ ( डाव घोषित), १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३ बाद ५०५ ( डाव घोषित) आणि २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४९९ धावा केल्या होत्या. 

पाहा व्हिडीओ१२५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर जडेजाने दिशेने हलका फटका मारला. एक धाव पूर्ण केल्यानंतर मोहम्मद शमी दुसरी धाव घेण्यासाठी धावला, परंतु त्याने क्रिजची मध्यरेषा ओलांडल्यानंतर जडेजाने त्याला माघारी जाण्यास सांगितले. तोपर्यंत श्रीलंकेच्या खेळाडूने चेंडू फर्नांडोच्या दिशेने थ्रो केला. फर्नांडोनेही नॉन स्ट्रायकर एंडच्या बेल्स उडवल्या. पण, त्याला हे लक्षात आलं नाही की भारताचे दोन्ही फलंदाज त्याच दिशेने आहेत. त्याने यष्टिरक्षकाकडे चेंडू फेकण्यास विलंब केला आणि शमी सुखरूप क्रिजच्या आता पोहोचला. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारवींद्र जडेजामोहम्मद शामी
Open in App